Dahi Tadka Sandwich Video: सकाळच्या गडबडीत अनेकदा भूक लागलेली असते पण एखादा पदार्थ बनवावा एवढी शक्ती नसते आणि वेळ तर अजिबातच नसतो. तुम्हा- आम्हा सगळ्यांचीच ही अवस्था आहे. त्यामुळे आज आपण उत्तर सुद्धा एकत्रच पाहणार आहोत. अनेक भारतीय पदार्थ पटकन तयार होतात. रव्याचा उपमा, शिरा, पोहे हे सगळं आपल्याही घरोघरी बनत असतं पण कधीतरी याला ब्रेक हवा ना? म्हणून आज आपण सॅन्डविचची रेसिपी पाहणार आहोत. ते सुद्धा बटाटा, काकडी, टोमॅटोचं तेच तेच मसाला भाजी सँडविच नव्हे तर दह्याचं तडका सँडविच बनवायला आज आपण शिकणार आहोत. चिंता करू नका हे काही आंबट वगैरे लागत नाही उलट चीजप्रमाणे चव आणून तुम्हाला याची लज्जत चाखता येऊ शकते. हे सगळं कसं करायचं हे पण पाहूया..

दही तडका सँडविच

साहित्य

ब्रेड (आवडीनुसार, पांढरा किंवा ब्राऊन)
हंग कर्ड 400 ग्रॅम (यासाठी दही मलमलच्या कपड्यात किंवा मऊसूत कापडामध्ये काढून घ्या त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. त्यावर एखादी जड वस्तू ठेवा)

How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
besan cheese toast recipe
सकाळी झटपट नाश्ता बनवायचाय? मग एक वाटी बेसनापासून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी
How To Make Kobi paratha
Kobi Paratha : पौष्टीक आणि स्वादिष्ट! कोबीचा बनवा पराठा, न आवडणारे देखील आवडीने खातील
methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
masala chaap recipe
रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ आता घरच्या घरीच बनवा, सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

आवडीनुसार भाज्या

लाल, पिवळी, हिरवी भोपळी मिरची (बारीक चिरून)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली हिरवी मिरची
सैंधव मीठ
काली मिरी पावडर
चिली फ्लेक्स, ओरिगॅनो
ताजी कोथिंबीर बारीक चिरून
तूप किंवा बटर
मोहरी व कडीपत्ता

रेसिपी

आपण एका भांडयात घट्ट झालेले दही काढून घ्या. त्यात एक एक करून सगळ्या आवडीच्या भाज्या घाला. एका तडका पॅन मध्ये तूप घेऊन त्यात हिरवी मिरची, मोहरी, कडीपत्ता टाकून फोडणी दह्यात घाला. हे मिश्रण नीट एकत्र करून घ्या व त्यात मीठ, काळी मिरी पावडर घालून वरून कोथिंबीर घाला.

ब्रेडच्या कडा कापून घेऊ शकता तुम्हाला आवडत असल्यास कडा तशाच ठेवा. ब्रेडवर तूप किंवा बटर लावून भाजून घ्या मग त्यात हे दह्याचे मिश्रण लावून वरून दुसरा ब्रेड लावा.

तयार सँडविच तव्यावर भाजून घ्या. एक प्रो टीप म्हणजे परफेक्ट क्रिस्पी सँडविचसाठी आपण तव्यावर ब्रेड भाजताना त्यावर एखादी वजनाची वस्तू ठेवून दाब देऊ शकता जेणेकरून ग्रील सारखा क्रिस्प येऊ शकतो.

हे ही वाचा<< Video: नितीन गडकरींनी सांगितली पुण्यातील प्रसिद्ध वड्याची रेसिपी करा ट्राय; म्हणाले, “मी ३ मोठे वडे खाऊ शकतो”

एक टीप म्हणजे शक्यतो दही वापरत असल्याने अन्य आंबट चवीच्या भाज्या जसे की टोमॅटोचा वापर टाळा. दही रात्रीच बांधून ठेवल्यास सकाळपर्यंत त्याला छान क्रिमी चिजी चव येऊ शकते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा.

Story img Loader