परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होते. याच सुट्टीचा फायदा घेत विविध संस्था या काळात कला, क्रीडा शिबिराचे आयोजन करत आहेत. पालकही अशा शिबिरांना मुलांना पाठवत असून त्यातून काही तरी नवे शिकेल, अशी पालकांची धारणा निर्माण होत आहे. त्यामुळे उन्हाळी शिबिरांना पालकांनी पसंती दर्शवली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं ठरतंय कि वेगळा काही खास बेत..? तत्पूर्वी तुमच्यासाठी काही महत्वाचे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या मनात सहज प्रश्न आला असेल की ऍडव्हेंचर एजुकेशन हि काय भानगड आहे… अगदी बरोबर.. एक पालक म्हणून, आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या गोष्टी द्यायची इच्छा असते, त्यांना घडवण्यासाठी.. प्रतिकूल परिस्थिती असताना त्यातून मार्ग काढणे, सामूहिकरीत्या सगळ्यांशी जुळवून काम कसे करावे आणि इतिहास, संस्कृती व निसर्गाशी असलेली आपली नाळ कायम घट्ट कशी ठेवावी ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये कायमस्वरूपी बिंबवण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणजे निसर्ग प्रशिक्षण किंवा साहस प्रशिक्षण

म्हणूनच आपण त्यास ‘ऍडव्हेंचर एजुकेशन’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संदर्भ म्हणून सरहद्दीवर तैनात असलेले आपले वीर जवान आठवा, किंवा आपल्या इतिहासामधील अनेक प्रसंग, अनेक व्यक्तिरेखा घ्या. एका विश्वसनीय सर्वेक्षणानुसार, साहस शिबिरांचा अनुभव असलेली मुले आत्मविश्वास, सामान्य ज्ञान, संघटित कार्य व विचारशीलता अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये इतरांपेक्षा उजवी ठरतात.

आणि म्हणूनच प्रयत्नपूर्वन, जाणीवपूर्वक ‘आल्डोज एडव्हेंचर’ (माऊंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली) मार्फत, डोंबिवलीमध्ये प्रथमच एकदिवसीय साहस प्रशिक्षण शिबीर, रोज एक बॅच (जास्तीत जास्त ४० ते ६० मुले) अशा स्वरूपात दिनांक ६ एप्रिल ते १३ एप्रिल २०१९ ह्या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे. यामध्ये दुपारचे जेवण, संपूर्ण साहित्य, सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणे व अनुभवी प्रशिक्षक, तज्ज्ञ असे सर्व काही एक मिळून आपल्या एकदिवसीय साहस शिबिरासाठी नाममात्र ९०० रूपये मोजावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी : आल्डोज एडव्हेंचर