रोज एक तास दूरचित्रवाणी बघितल्याने मधुमेहाची शक्यता ३ टक्क्य़ांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी मधुमेह प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील माहितीचा आधार यात घेतला आहे.
या अभ्यासानुसार ३२३४ जास्त वजनाच्या अमेरिकी प्रौढांचा यात समावेश करण्यात आला होता व ते पंचविशीच्या वयोगटातील होते. त्यांच्यात टाइप २ प्रकारचा मधुमेह कमी करण्यासाठी जीवनशैलीचे प्रयोग तसेच मेटफॉरमिन याचा वापर केला जात होता. ‘डायबेटोलिगिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार मधुमेहावर माणसाच्या जीवनशैलीचे परिणाम तपासण्यात आले. त्यात सहभागी व्यक्तींना एक तास दूरचित्रवाणी पाहण्याने मधुमेह होण्याचा धोका ३.४ टक्के वाढल्याचे दिसून आले. त्यात वय, लिंग, उपचार व शारीरिक व्यायामाचा कालावधी या गोष्टींचे समायोजन करण्यात आले होते. या संशोधनानुसार जास्त काळ दूरचित्रवाणी पाहिल्याने निष्क्रियता वाढून वजन २.१ टक्के वाढते त्यामुळे विकसित देशात मधुमेहाचा संबंध हा दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही पाहण्याशी आहे. शरीराचे वजन वाढल्याने बसण्याच्या पद्धतीही बदलून जातात. पीटसबर्ग विद्यापीठाच्या डॉ. आँद्रिया क्रिस्का यांनी म्हटले आहे, की हे संशोधन महत्त्वाचे आहे कारण एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहण्याने हा धोका असतो. त्यामुळे जीवनशैलीत जर आपण एकाच ठिकाणी बसण्याचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोग होतो. माणसात जास्त क्रियाशीलता असेल, तर त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे एकाजागी जास्त काळ बसण्याचे टाळावे.
रोज तासभर दूरचित्रवाणी बघणे मधुमेहास कारणीभूत?
रोज एक तास दूरचित्रवाणी बघितल्याने मधुमेहाची शक्यता ३ टक्क्य़ांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-04-2015 at 05:10 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One hour watching tv can increase your risk of diabetes