जेथे गोड वस्तू, तेथे मुंग्या या लागतात आणि किचनमध्ये सारखेच्या डब्याला तर अनेकदा मुंग्या लागतात. पावसाळ्यात मुंग्या लागण्याचे हे प्रमाण आणखीनच वाढते. त्यामुळे या मुंग्यांपासून कशी सुटका करायची, हे कळत नाही. पण, फक्त एक रुपयामध्ये तुम्ही साखरेला लागलेल्या मुंग्या घालवू शकता. चला तर जाणून घेऊ या सविस्तर कसे काय ते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साखरेला मुंग्या लागल्यानंतर काय करावे?

अनेकदा लोक साखरेला मुंग्या लागल्यानंतर साखर फेकून देतात किंवा काही लोक मुंग्या लागलेली साखर निवडून बाजूला काढतात; पण एका ट्रिकने तुम्ही काही मिनिटांमध्ये साखरेतून मुंग्यांना पळवून लावू शकता.
जर साखरेच्या डब्याला मुंग्या लागल्या, तर तुम्ही फक्त एक रुपयाच्या या वस्तूने मुंग्या पळवू शकता आणि ती वस्तू म्हणजे कापूर. तुम्ही कापराच्या मदतीने मुंग्या घालवू शकता. त्यासाठी कापराचे एकदोन तुकडे साखरेच्या डब्यात टाका आणि डब्याचे झाकण उघडे ठेवा. मग बघा मुंग्या काही क्षणांतच गायब झालेल्या तुम्हाला दिसतील.
याशिवाय गरम पाण्याच्या मदतीनेही तुम्ही मुंग्या पळवू शकता. मुंग्या लागलेली साखर एका प्लेटमध्ये टाका आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. या भांड्याच्या मधोमध साखरेची प्लेट ठेवा. मुंग्यांना चटके लागताच मुंग्या पळून जातील.

साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून काय करावे?

साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून एका चांगल्या स्वच्छ डब्यात साखर ठेवावी. डब्याचं झाकण नेहमी नीट लावावं; ज्यामुळे डब्याच्या आत मुंग्या शिरणार नाहीत. त्याशिवाय लवंग, वेलची, तमालपत्रासारखे गरम मसाल्याचे तुकडे साखरेच्या डब्यात ठेवावेत. मग कधीही साखरेला मुंग्या लागणार नाहीत.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One rupees thing can keep sugar safe from ants home remedies ndj
Show comments