लैंगिक समस्यांवर काही किशोरवयीन मुला-मुलींना डॉक्टरांशी बोलणे अवघड वाटत असेल हे समजण्यासारखे आहे. मात्र, या लाजरे पणामुळे कितीतरी समस्या निर्माण होत आहेत. किशेरवयीन मुलांच्या अशा वागण्यामुळे डॉक्टरांना देखील मोकळेपणे त्यांच्याशी लैंगिक शिक्षणावर बोलण्यात व त्यांचे समुपदेशन करण्यावर मर्यादा येत आहेत. एका नव्याने करण्यातआलेल्या संशोधनातून एकतृतियांश किशोरवय़ीन डॉक्टरांशी लैंगिकसमस्या व लैंगिकतेवर बोलतच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘जेएएमए पेडियाट्रीक’ जर्नलने हा अहवाल प्रसिध्द केला आहे.
या गप्प बसण्यामुळे प्रत्येक वर्षी लाखांवर किशोरवयीन मुलांना लैंगिक रोगांची लागण होत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे संशोधक स्टिवर्ट अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास करण्यात आला. दरम्यान, एकूण २५३ किशोरवयीन मुलांशी आणि ४९ डॉक्टरांशी संवादसाधून काही नोंदी घेण्यात आल्या. लैंगिक आजाराने पिडित असलेल्या मुलांशी डॉक्टरांनी केलेल्या संवादांचे ध्वनीमुद्रन देखील करण्यात आले. यामध्ये ३० टक्के किशेरवयीन १ ते ३५ सेकंदच लैगिकतेवर व लैगिकसमस्यांवर बोलत होते. ३५ टक्के किशोरवयीन याच समस्यांसदर्भात ३६ सेकंदांपेक्षा अधिक बोलल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.   

Story img Loader