मोबाईलच्या कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञानाचे फोन भारतात दाखल होत आहेत. नुकत्याच भारतीय बाजारात आलेल्या OnePlus कंपनीने अतिशय कमी काळात आपले स्थान निर्माण केले. नुकतीच कंपनीने आपल्या 6T या मॉडेलची पुढची आवृत्ती बाजारात दाखल केली असून त्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोनची खासियत म्हणजे या फोनला १० जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच या फोनच्या चार्जिंगसाठीही Warp Charge 30 हे विशेष तंत्रज्ञान फोनमध्ये देण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात OnePlus 6T लाँच करण्यात आला होता. त्याला जगभरात अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीने हा हे पुढचे व्हर्जन लाँच केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतात OnePlus 6T ची किंमत ४० हजारांच्या घरात होती. तर OnePlus 6T McLaren Edition या फोनची किंमत काय असणार याबाबत बरीच उत्सुकता होती. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही किंमत ५० हजार रुपयांच्या घरात असेल असे सांगण्यात येत आहे. या फोनच्या स्क्रीनसाठी वापरण्यात आलेल्या काचेखाली कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. काळ्या रंगाच्या या फोनला खालच्या बाजुने फिकट केशरी रंगाची स्ट्रीप देण्यात आली आहे. तसेच या फोनसोबत Warp Charge 30 तंत्रज्ञानाची फिकट केशरी रंगाची वायरही देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे फोन २० मिनीटांत दिवसभर चालेल इतका चार्ज होणार आहे. आजपासून हा फोन अॅमेझॉन आणि वनप्लसच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे. या फोनला १६ मेगापिक्सल आणि २० मेगापिक्सल असे दोन रियर कॅमेरे देण्यात आला असून १६ मेगापिक्सलचा एक फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.