सध्याच्या काळामध्ये अनेक जणांना साऊथ इंडियन पदार्थ आवडतात. त्यात डोसा, इडली, मेदुवडा आणि अन्य पदार्थांचा समावेश आहे. नाश्त्यामध्ये सांबार आणि चटणीसह डोसा खायला आवडतो असे अनेक सेलिब्रेटी अनेकदा सांगतात. डोसा खाण्यापेक्षा तो तयार होण्याचा, त्याचा मनमोहक आकार आणि रचना बघण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात नाही. आपण छानपैकी कुठल्याही हॉटेलात जाऊन बसतो. प्रत्येकाच्या आवडीचा डोसा मागवतो. कुणाला साधा डोसा हवा असतो, कुणाला मसाला, कुणाला रवामसाला, कुणाला पेपर डोसा, कुणाला म्हैसूर मसाला. मध्येच कुणीतरी उत्तप्पा मागवतं. शक्यतो आपली डिश वेगळी असायला हवी, हा आग्रह प्रत्येकाचा असतो.
अनेक जण घरी डोसा करताना असा प्रयत्न करतात की आपला डोसा बाहेर असतो तसा व्हावा. अनेकदा लोखंडी तव्यावर डोसा करतात तेव्हा तो चिकटतो. त्यामुळे तवा खराब होतोच तसेच डोसाची चव देखील खराब होते. आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही बाजारात असतो तसा कुरकुरीत डोसा तयार करू शकता. यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आज आपण पाहुयात. याबाबतचे वृत्त amarujala ने दिले आहे.
हेही वाचा : दुधासह ‘हे’ पदार्थ तुम्हीही खाता का? आताच थांबवा, अन्यथा आजारी पडाल…
तवा स्वछ असावा
जर का तुम्ही डोसा तयार करत असाल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्या तव्यावर डोसा करणार आहात तो तवा नीट स्वच्छ करून घ्यावा. जर का त्यावर घाण किंवा तेल राहिले तर डोसा चांगला होत नाही. यासाठी नेहमी तवा स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
कांदा किंवा बटाट्याचा वपर करावा
डोसा तयार करण्यासाठी तवा आधी तयार असणे आवश्यक आहे. तो स्वछ असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कांडा आणि बटाटा अर्धा कापून तेलात बुडवावा. तेलात बुडवलेला आर्धा कांडा किंवा बटाटा तव्यावर फिरवावा. यामुळे डोसा करण्यास फायदा होतो.
तवा गरम करून गार करावा
जर का तुमचा डोसा सतत चिकटत असेल तर तवा एकदा गरम करून घ्यावा. तसेच नंतर तो थंड करावा. यामुळे जेव्हा तुम्ही डोसा तव्यावर घालल तेव्हा तो चिकटणार नाही व कुरकुरीत डोसा तयार होईल.
हेही वाचा : नाश्ता करताना टाळा ‘हे’ पाच पदार्थ! नाहीतर वाढेल वजन, होतील पोटाचे आजार
या चुका टाळा
तुम्ही जर का डोसा करणार असाल तर त्याचे बेटर (डोशाचे पीठ) फ्रिजमधून बाहेर काढल्या काढल्या त्याचा वापर करू नका. डोसा करण्यापूर्वी ते आधी थोडावेळ बाहेर काढून ठेवा. तसेच त्या पिठामध्ये जास्त पाणी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.