तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. खास करून मुलांच्या डब्यात काय पदार्थ द्यावे हे सुचत नाही. पोळीभाजी नको, पराठे खाऊन कंटाळा आला, सँडविच काय तेच तेच.. मग असे करायचे की हे पदार्थ वेगळ्या रूपात द्यायचे. आता सँडविच. नेहमीचे कसे असते, बटाटा, चटणी, काकडीबरोबर नाही का! मग सँडविचला वेगळे रूप द्यायचे. नेहमीचे सँडविच बंद असते, हे ओपनफेस ठेवायचे.

साहित्य

उकडलेला बटाटा, शिमला मिरची, गाजर, फरसबी, चाट मसाला, चिली फ्लेक्स, जिरे पूड, लसून, मीठ, लिंबू, ब्रेड, चिझ किंवा बटर.

कृती

उकडलेला बटाटा किसून त्यात हवी तर शिमला मिरची, गाजर, फरसबी काहीही घाला. मात्र अत्यंत बारीक चिरून. आता यात हवा तो मसाला टाका. चाट मसाला, ड्राय हॅर्ब्स, चिली फ्लेक्स, जिरे पूड, लसूण, मीठ, लिंबू रस चांगले एकत्र केले की ब्रेडचे लांबट तुकडे करा. त्यावर हे मिश्रण थापा. वरून चीझ किसून घाला अथवा थोडे बटर घाला. साधारण ग्रील करा किंवा तव्यावर शेकवून द्या. हे सँडविच मेयो किंवा चटणीसोबत खायला द्या.

Story img Loader