सध्या 5G स्मार्टफोनचा ट्रेंड खूप वाढला आहे. तुम्ही देखील नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात ओप्पो कंपनीने त्यांचा नवीन 5G स्मार्ट फोन लॉंच केला आहे. ओप्पोचा ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी (Oppo Reno 6 Pro 5G) हा स्मार्टफोन तुम्ही चांगल्या ऑफरसह खरेदी करू शकता. ओप्पो रेनो 6 प्रो 5G हा स्मार्टफोन भारतात ३९,९९० रुपयांच्या किंमतीत लॉंच करण्यात आला आहे. दरम्यान फ्लिपकार्टकडून मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही हा स्मार्टफोन केवळ ३३,९९० रुपयांच्या किंमतीत विकत घेऊ शकतात. हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला चांगल्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान यावेळी हा स्मार्टफोन तुम्ही HDFC कार्डमधून खरेदी करत असाल तर तुम्हाला ३,००० रुपयांची सूट देण्यात येत आहे.
वैशिष्ट्ये
ओप्पो रेनो 6 प्रो 5G मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी + कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1080× 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येत आहे. यात अल्ट्रा स्लिम डिझाइन आणि 3डी बॉर्डरलेस सेन्स स्क्रीन आहे. 12 जिबी GB रॅमसह फोनमध्ये 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच या फोन मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1200 प्रोसेसर उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन बाजारातील सर्वात सुंदर स्मार्टफोनपैकी एक असून ओप्पोने त्यात रेनो ग्लो टेक्नोलॉजी दिली आहे. त्यात या स्मार्ट फोन हा मॅट फिनिश देण्यात आली आहे. ज्याने या फोनचा मागील भाग चमकदार दिसतो.
64 मेगापिक्सेल कॅमेरा
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनो कॅमेरा सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी आहे.जी 65 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.