‘ओप्पो ए७’ हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. ‘ओप्पो ए७’द्वारे काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या शाओमीच्या रेडमी नोट 6 प्रो या स्मार्टफोनला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. नेपाळ आणि चीनमध्ये हा स्मार्टफोन यापूर्वीच लाँच झाला होता. भारतात १६ हजार ९९० रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे. याशिवाय अॅमेझॉनवर अनेक ऑफर्सही आहेत. जुन्या फोनच्या बदल्यात नवा ए७ फोन खरेदी करायचा असल्यास २११० रुपयांची सूट मिळणार आहे, म्हणजेच हा फोन अवघ्या १४८८० रुपयांना विकत घेता येईल. एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डवर हफ्त्यावर फोन घेतल्यास अतिरिक्त ५ टक्के सूट मिळणर आहे. ग्लेयरिंग गोल्ड आणि ग्लेज ब्लू रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी स्टोरेज, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर आहे. अॅड्रॉइड ८.१ ओरिओ बेस्ड कलर ओस ५.२ प्रणालीवर हा स्मार्टफोन कार्यरत असेल. यामध्ये ४२३० मेगावॅटची पावरफूल बॅटरी असून ड्युअल सिम सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा आहे. एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल प्रायमरी व २ मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर असलेला रिअर कॅमेरा, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये ब्लूटूथ ४.२, जीपीएस, वायफाय, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि मायक्रो युएसबी पोर्ट आहे.