भारतात एक एप्रिलपासून वाढलेल्या जीएसटी दरांमुळे स्मार्टफोन महाग झाले आहेत. ओप्पोचे कंपनीनेही Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या किंमतीतही वाढ केली होती. वाढलेल्या जीएसटी दरांमुळे फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,990 रुपये, तर 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18, 490 रुपये झाली होती. पण, आता कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे.
91mobiles च्या वृत्तानुसार, ओप्पो ए9 2020 च्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजे, आता ओप्पो ए9 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट आधीप्रमाणे 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ही ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधील किंमत आहे. करोना व्हायरस लॉकडाउनमुळे सध्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांसारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ऑर्डर स्वीकारत नाहीयेत, त्यामुळे तिथे अजून नवीन किंमत अपडेट झालेली नाही.
फीचर्स :- Oppo A9 2020 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असून 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळतो. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. ओप्पोचा हा फोन Android v9.0 (Pie) ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतो. यामध्ये 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पो A9 2020 मध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा, तर अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP , 2MP आणि 2MP क्षमतेचे आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.