आहारात फळे, भाज्या आणि सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु काही लोकांना काही फळे, भाज्या आणि ड्रायफ्रुट्स खाण्याची अॅलर्जी असते, ज्यामुळे ओरल ऍलर्जी सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष प्रकारची ऍलर्जी असते. ही एक सामान्य स्थिती आहे ज्यामध्ये हंगामी ऍलर्जीक rhinoconjunctivitis असलेले रुग्ण काही फळे आणि भाज्या खाल्ल्यानंतर घशाला खाज येत असल्याची तक्रार करतात.

काही फळे खाल्ल्यानंतर घश्याला का खाज येते?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या २०१९ च्या अभ्यासानुसार, ऍलर्जी असलेल्या लोकांना तोंड आणि घशात खाज येऊ शकते. ज्यांना ऍलर्जी आहे त्यांना घसा खवखवणे, ओठ, तोंड, जीभ आणि घसा सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऍलर्जी अस्थमा आणि इम्युनोलॉजीच्या संशोधनात असे म्हटले आहे की या ऍलर्जी ५० ते ७५ टक्के प्रौढांमध्ये आढळतात. कारण काही फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारी प्रथिने परागकणांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनेंसारखीच असतात.

neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचा आहार कसा असला पाहिजे? तज्ञांकडून जाणून घ्या)

ऍलर्जीसाठी जबाबदार घटक:

प्रथिने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला गोंधळात टाकू शकतात आणि एलर्जी निर्माण करू शकतात. आरोग्याची काळजी न घेतल्यास, त्याची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात ज्याला क्रॉस-रिअॅक्टिव्हिटी म्हणतात. परागकण आणि अन्न यांच्यातील क्रॉस-रिअॅक्टिव्हिटीला ओरल ऍलर्जी सिंड्रोम म्हणतात. कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन करून या ऍलर्जीचा धोका जास्त असतो हे जाणून घेऊया.

मधुकर रेनबो हॉस्पिटल, दिल्लीचे डॉ प्रवीण खिलनानी यांच्या मते , ‘क्रॉस रिअॅक्टिव्हिटी’ झाल्यास एखाद्याला परागकण ऍलर्जी होऊ शकते. विशेषतः कच्ची फळे खाल्ल्यानंतर त्याची लक्षणे अधिक दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, सफरचंद, बदाम, हेझेल नट्स, किवी, पीच, सेलेरी किंवा काकडी या सर्वांमुळे ऍलर्जी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, घशात खाज येण्याची समस्या सहसा फळे खाल्ल्यानंतर उद्भवते. ऍलर्जीक राहिनाइटिस ही परागकण ऍलर्जी आहे ज्यामुळे वाहत्या नाकासह श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

( हे ही वाचा: हाताच्या त्वचेची सालं निघण्यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या त्यावर योग्य उपचार)

तुम्हाला ऍलर्जी असल्यास, ही फळे आणि भाज्या अजिबात खाऊ नका:

  • केळी, चेरी, सफरचंद,टोमॅटो, काकडी, संत्र, बेल मिरी, सूर्यफूल बिया, गाजर, ताजी औषधी वनस्पती
  • ऍलर्जी टाळण्यासाठी पदार्थांचे सेवन कसे करावे:
  • ज्या लोकांना या ऍलर्जीचा त्रास आहे त्यांनी फक्त पिकलेली फळे आणि भाज्या खाव्यात. कारण गरम होण्याच्या प्रक्रियेत प्रथिने विकृत होतात आणि प्रतिकारशक्ती अन्न ओळखू शकत नाही.

Story img Loader