दररोज संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी असते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी आवश्यक असणार अनेक घटक संत्र्यामध्ये असतात. त्यामुळे रोजच्या रोज त्याचे सेवन केल्याने कोणत्याही व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
‘न्यूट्रिशन ऍंड कॅन्सर’ या जर्नलमध्ये या संशोधनासंदर्भात लेख छापण्यात आला आहे. संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने कर्करोगाची लागण होण्याची आणि त्याची वाढ होण्याची शक्यता मंदावते, असे संशोधकांना आढळून आले. अर्थात हवामान, लागवडीखालील जमीन, फळाची पक्वता आणि ज्यूस काढल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी त्यामध्ये घातले जाणारे पदार्थ याचा कर्करोगाची लागण रोखण्यासाठी संत्र्यांमध्ये उपजत असणाऱया पदार्थांवर परिणाम होत असतो, असेही संशोधकांना आढळूले.

Story img Loader