‘ऑर्थोटिक्स अॅण्ड प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ १९७९ पासून दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच संबंधित विषयातील तज्ज्ञ यात सहभागी आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाया रचण्याचे कार्य करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने यावर्षीही नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
५०० पेक्षा जास्त तज्ज्ञांची उपस्थिती!
‘ऑर्थोटिक्स अॅण्ड प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (पश्चिम विभाग) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या २६ व्या नॅशनल कॉन्फरन्सचा मान यावर्षी गोवा राज्याला मिळालेला आहे. ही कॉन्फरन्स २८, २९ व ३० मार्च रोजी पणजी कन्व्हेंशन सेंटर, गोवा येथे होणार असून भारतातील विविध राज्यांतून तसेच परदेशातूनही विद्यार्थी, प्राध्यापक, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर यासाठी उपस्थित राहणार आहेत. ५०० पेक्षा जास्त प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स तसेच पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती निश्चित झाली आहे.
यात विविध प्रकारच्या संशोधनावर चर्चा केली जाते तसेच यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे, तंत्रज्ञान तसेच या विषयातील तज्ज्ञांच्या विचारांचे आदान-प्रदानही करण्यात येते. या वेळीदेखील यामध्ये विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या संशोधनपर लेखांचे प्रदर्शन तसेच क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्सशी संबंधित विविध प्रकारच्या साधनांचे प्रदर्शनदेखील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या कॉन्फरन्ससाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कॉन्फरन्समधून दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी भविष्यात अनेक नवनवीन पर्याय निर्माण होतील हे नक्की.
(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून ‘या’ भाज्यांचा करा समावेश!)
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण
भारताच्या विविध राज्यांमध्ये ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्स या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या सुमारे नऊ प्रतिष्ठित संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. यामध्ये मुख्यतः मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, कटक, चेन्नई यांसारख्या शहरांचा समावेश होतो. बारावीनंतर संबधित विषयासाठी असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. हे खाते आरोग्य विभागाशी संलग्न असून रुग्णांवरील उपचार आणि वैद्यकीय शिक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या)
कोकण विभागात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून डॉ. राजेंद्र कशेळकर हे ऑर्थोटिक्स अॅण्ड प्रोस्थेटिक्स या विषयातील एकमेव तज्ज्ञ असून ते रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत होते. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने विविध प्रकारची शिबिरे,माहिती सत्रे, चर्चासत्रे यांचे आयोजन केले असून त्यांना सर्व प्रकारची सहाय्यता देण्याचे कार्य निवृत्तीनंतरही सुरूच ठेवले आहे. मुख्यतः कृत्रिम अवयव बनवणे, पोलिओच्या रुग्णांसाठी कॅलिपर, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशिष्ट प्रकारची उपकरणे बनवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पणजी, गोवा येथे होणाऱ्या २६ व्या नॅशनल कॉन्फरन्सचे ते संयोजकदेखील आहेत.