Winter Health Tips: थंडीची चाहुल लागली की, आजारपण बळावायला सुरूवात होते. हिवाळ्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणं अशा समस्या हमखास उद्भवतात. मग त्यावर अ‍ॅन्टीबायोटिक्स औषधं घेण्याऐवजी घरगुती काही पर्याय देखील फायदेशीर ठरू शकतात. ओवा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्यापासून बनवलेल्या काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दीपासून आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊया ओव्याच्या काढ्याचे जबरदस्त फायदे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओवा वाढवतो रोगप्रतिकारक शक्ती
ओव्याचा वापर भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या काळापासून केला जात आहे. ओव्याची एक वेगळी तिखट चव असते जी लोणचे, करी आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. याचे बहुतांश औषधी गुणधर्म त्याचा अ‍ॅक्टिव्ह घटक थायमॉलमधून येतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

आणखी वाचा : World Diabetes Day 2022: मधुमेह झालाय? मग, ‘ही’ फळं खाणं टाळा!

सर्दी आणि खोकल्यात ओवा फायदेशीर
ओवा एक अँटिऑक्सिडेंट आहे, जो फ्री रेडियल हालचाली रोखण्यास मदत करतो. ओव्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतात, जे तुम्हाला हंगामी संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. सर्दी, चोंदलेले नाक आणि छातीमधील कंजेक्शनमुळे होणारी अस्वस्थता दूर करण्यात मदत होते.

या’ पद्धतीने तयार करा ओव्याचा काढा

साहित्य

– २ चमचे ओवा
– तुळशीची पाने
– १ टीस्पून काळीमिरी
– १ चमचा मध

काढा बनवण्यासाठी पॅनमध्ये ओवा, तुळशीची पाने, काळी मिरी, एक कप पाणी घालून ५ मिनिटे शिजवा. ते गाळून त्यात मध टाकून प्या. काढा बनवताना त्यात मध घालू नये, हे लक्षात ठेवा. अति उष्णतेमुळे मधाचे औषधी गुणधर्म नष्ट होतात. हा काढा दिवसातून दोनदा प्यायल्याने लवकर आराम मिळतो. काढ्याची तिखट चव आवडत नसेल तर गरम पाण्यात मूठभर ओवा टाका टाकून दिवसभर प्यावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ova decoction is beneficial to get relief from cold and cough in winter pdb
Show comments