control your Unwanted Food cravings with simple hack : डाएट सुरू असताना समोर एखादा चटपटीत किंवा गोड पदार्थ दिसला की, आपल्यातील कोणालाच राहवत नाही. मग केव्हा केव्हा तर आपण डाएटिंग सोडून थोडंसं का होईना गोड पदार्थ चाखून पाहतोच… पण, असं किती वेळा तुमच्याबरोबर घडलं आहे? आठवत नसेल… तर असा प्रसंग आल्यावर अगदीच डाएटिंग सोडण्याची तुम्हाला खरंच गरज नाही. कारण- पुढच्या वेळी असा क्षण तुमच्यासमोर आल्यावर, फक्त एक पाऊल मागे घ्या आणि फक्त पाच मिनिटं शांत बसा. पण, आता तुम्ही विचार करीत असाल की, पाच मिनिटांनी असा काय फरक पडू शकतो? तर असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आहात.

फिटनेस ट्रेनर ऋषभ तेलंग यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वतःला पाच मिनिटे द्या आणि विचार करा की, तुम्हाला अजूनही तो नाश्ता हवा आहे का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल, तर तो नाश्ता नक्की खा. पण, या तुम्ही १० पैकी आठ वेळा या साध्या हॅकच्या मदतीनं तुमच्या सवयीला आळा घालू शकता. आपल्या सगळ्यांनाच डाएट करताना चटपटीत खाण्याची खूप इच्छा ( Food Cravings) असते. पण, काही वेळेस हार मानायला हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही ८०:२० नियमाचे पालन कराल, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे ट्रॅकवर आहात, असा फिटनेस ट्रेनर ऋषभ तेलंग यांचा विश्वास आहे.

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ

हेही वाचा…Remove Forehead Acne : दिवसातून दोन ते चार वेळा ‘हे’ फळ खाल्ल्याने कपाळावरील मुरुम होतील दूर? हे खरंच फायदेशीर आहे का? पाहा काय म्हणतात डर्मेटोलॉजिस्ट

क्रेव्हिंगची समस्या झटक्यात होईल दूर?

तर या हॅकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्राच्या आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. डाएटदरम्यान सारखं काहीतरी गोड, चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होत ( Food Cravings) असेल, तर यावर उपाय शोधणं गरजेचं ठरतं. तर हा उपाय म्हणजे तुम्ही ‘फक्त पाच मिनिटं थांबा आणि दीर्घ श्वास घ्या’, असं केल्यानं व्हिज्युअलायजेशन तुमची चिंता कमी करून, तुमचं मन आवडतं चॉकलेट, आइस्क्रीम किंवा चिप्स खाण्याचा पुनर्विचार करण्यास मदत करू शकतं, असं आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी म्हणाल्या आहेत.

ती पाच मिनिटं तुमचा मेंदू रिसेट करून तुम्हाला जंक फूड खाण्यापासून दूर ठेवतील आणि तुमचं लक्ष अधिक रचनात्मक विचारांकडे वळवतील. हा काळ आत्मचिंतनातही मदत करू शकतो. तुम्ही स्वतः च विचार करा की, या गोष्टी खाण्याची तुम्हाला खरंच गरज आहे का? अशा वेळी तुम्हाला जंक फूड सेवन का करावंसं वाटत आहे? याचं कारण समजण्यास मदत होईल, असं आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी म्हणाल्या आहेत. तर पाच मिनिटांचा हा हॅक तुम्हाला दीर्घकाळासाठी क्रेव्हिंगवर (Food Cravings) नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. जेव्हा तुम्हाला क्रेव्हिंग वाटेल तेव्हा थांबा, तुम्हाला त्याची गरज आहे का हे स्वतःला विचारा. तुमच्या ध्येयाची स्वतःला आठवण करून द्या, असं आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी म्हणाल्या.

आपल्यातील बहुतांश जण कितीही उपाय केले तरीही अशा क्रेव्हिंगला (Food Cravings) शेवटी बळी पडतात. पण, ही एक मानवी कृती आहे; जी स्वाभाविक आहे. खूप दिवसांचे अंतर ठेवून तुम्ही एखादा गोड किंवा चटपटीत पदार्थ खाऊ शकता; पण दररोज नाही. कारण- या क्रेव्हिंगमुळे तुमचं वजन व तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशातच तुम्हाला आणखीन सोपा उपाय हवा असेल, तर तुम्ही कोरडी फळं खाऊन किंवा फक्त पाणी पिऊन तुमची क्रेव्हिंग आरोग्यदायी पद्धतीनं पूर्ण करू शकता.

Story img Loader