अँटीबायोटिक्सचे अतिसेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हाला माहित आहे की अँटीबायोटिक्सचा अतिवापराने तुम्हाला बहिरेपण देखील येऊ शकते. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे कानातील पेशी मरतात ज्यामुळे व्यक्ती बहिरी होऊ शकते. अँटिबायोटिक्सच्या अतिवापराने ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नोंदवले आहे की अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे श्रवणासाठी जबाबदार असलेल्या पेशींमध्ये ऑटोफॅजी यंत्रणा सुरू होते, ज्यामुळे ऐकण्याच्या पेशी पूर्णपणे मरतात.
अनेकदा लोक किरकोळ समस्यांवर अँटीबायोटिक्सनी उपचार करतात. करोनाच्या काळात देखील लोकांनी काही अँटीबायोटिक्सचा खूप वापर केला आहे. तुम्हाला माहित आहे की अँटिबायोटिक्सचे अतिसेवन तुम्हाला इतर अनेक आजारांना बळी पडू शकते. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे अँटीबायोटिक्स रेसिस्टेन्सची क्षमता उद्भवू शकते, ज्यामुळे शरीरात असलेल्या जीवाणूंवर औषधांचा प्रभाव पडत नाही. सर्दी किंवा काही किरकोळ समस्या असताना तुम्हीही अँटीबायोटिक्स घेत असाल तर तुमची ही सवय बदला. अँटिबायोटिक्सच्या अतिवापराने कोणते दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया.
( हे ही वाचा: Uric Acid: रात्रीच्या जेवणात मांसाहारासह ‘या’ ५ गोष्टींचे सेवन केल्यास वेगाने वाढू शकते युरिक ऍसिड; त्वरित खाणे सोडा)
अँटीबायोटिक्सच्या अतिवापराचे दुष्परिणाम
- किरकोळ आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेतल्याने पचनाशी निगडीत चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि मळमळ होऊ शकते.
- उलट्या, चक्कर येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि ऍलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.
( हे ही वाचा: हृदयविकाराच्या रुग्णांना अंडी खाल्ल्याने त्रास होतो का? जाणून घ्या याचे सेवन किती आणि कसे करावे)
अँटीबायोटिक्स कधी घेणे आवश्यक आहे
तुमच्या इच्छेनुसार अँटिबायोटिक्स घेऊ नका. ही औषधे प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. काही लोक सर्दी झाल्यावर ही औषधे वापरतात. परंतु तुम्हाला माहित आहे की सर्दी किंवा फ्लूसाठी अँटीबायोटिक्स उपयुक्त नाहीत. तुम्हाला सर्दी किंवा घसा दुखत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.