What Is Overhydration आपले शरीर हे ६०% पाण्याने बनले आहे, म्हणजेच पाणी प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटकांपैकी एक आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, डिहायड्रेशनच्या समस्येतून सुटका हवी असल्यास नियमित जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त विषारी घटक सहजासहजी बाहेर फेकले जातात. तसंच पाण्यामुळे संपूर्ण शरीराचे कार्यही योग्यरित्या पार पडण्यास मदत मिळते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की जास्त प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते.

वैद्यकीय सल्लागार डॉक्टर आशुतोष शुक्ला यांच्या मते, जास्त पाणी पिल्याने प्रत्येकालाच त्रास होईल असं नाही. पण आपण त्याचे प्रमाण ठरवले पाहिजे. जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
banana diet weight loss
रोज रोज केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते? जाणून घ्या अन् गोंधळ दूर करा
What happens to the body if you include turmeric in your diet for 2 weeks straight
रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा….
sleep relation with health
Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं
Nisargalipi lesson in nature education
निसर्गलिपी – निसर्ग शिक्षणाचा धडा

किडनीवर ताण पडतो

ज्यांना किडनीच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ओव्हरहायड्रेशन ही एक समस्या बनू शकते. परिणामी, हायपोनेट्रेमियामध्ये रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होते. हृदय आणि किडनीचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.जास्त पाणी प्यायल्याने सतत लघवीला लागते. यामुळे किडनीवर ताण पडतो. हे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

किती पाणी प्यावे ?

डॉक्टर आशुतोष यांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सरासरी ८ ते १२ ग्लास पाण्याची आवश्यकता असते. तुमच्या शरीराच्या प्रत्येक २० किलो वजनासाठी तुम्हाला १ लिटर पाणी आवश्यक आहे. म्हणूनच, जर तुमचे वजन ६० किलो असेल, तर तुम्हाला दररोज ३ लिटर पाण्याची आवश्यक आहे.खासकरुन पुरुषांनी दिवसाला सुमारे ३.७ लिटर पाणी प्यावं तर महिलांनी २.७ लीटर) प्यावे.

हेही वाचा >> किडनी खराब करु शकते केसांची केराटिन ट्रिटमेंट? डॉक्टरांनी सांगितला धोका, कशी घ्याल काळजी

डॉ. आशुतोष यांनी असेही निदर्शनास आणून दिले की एखाद्या व्यक्तीला व्यायाम, वातावरण, एकूण आरोग्य, गर्भधारणा आणि स्तनपान अशा अनेक घटकांच्या आधारे त्यांच्या एकूण पाण्याच्या सेवनात बदल करण्याची आवश्यकता असू शकते. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.