अनेकदा आपण पाहिले आहे की अनेक लोक त्यांच्या दातदुखीमुळे खूप चिंतेत असतात. दात किडणे, कॅल्शियमची कमतरता, दात व्यवस्थित साफ न होणे,अक्कल दाढ येणे, बॅक्टेरियाचा संसर्ग अशा अनेक कारणांमुळे दात दुखी होते. अशा परिस्थितीत, काही लोक स्वतःहून औषधे घेणे सुरू करतात, ज्यामुळे काही वेळासाठी आराम मिळतो, परंतु ते हानिकारक देखील असू शकते. कारण खूप प्रमाणात औषधे खाल्याने आपल्या किडनीवर परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला दातदुखीचा त्रास कमी होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊया.
आणखी वाचा : “अचानक कारच्या खिडकीवर कोणी तरी ठोठावले अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
या घरगुती गोष्टींनी दातदुखी दूर करा
१. लवंग
लवंग दातदुखीसाठी खूप फायदेशीर मानली जाते, हा उपाय शतकानुशतके चालत आला आहे. लवंग हे आयुर्वेदिक औषध देखील मानले जाते, दातदुखीमध्ये ते खूप फायदेशीर आहे. दातांच्या समस्यांसाठी दोन ते तीन लवंगा घेऊन त्या थोड्या कुस्करून दाताखाली ठेवा, आराम मिळेल.
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
२. हिंग
हिंग ही दातदुखीसाठी उत्तम औषध मानले जाते, त्याचा वापर करण्यासाठी तुम्ही दोन ते तीन चिमूटभर हिंगात दोन ते चार थेंब लिंबाचा रस घाला आणि त्यानंतर त्या पेस्टने दातांना मसाज करा, काही वेळात आराम मिळेल.
आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर
३. सैंधव मीठ
सैंधव मीठ हे अनेक गोष्टींसाठी फायदेशीर मानले जाते, त्यामुळे दातदुखीवर हा एक उत्तम उपाय आहे. दातदुखीपासून सुटका हवी असेल, तर एका ग्लास कोमट पाण्यात सैंधव मीठ मिसळा आणि त्यानंतर पाण्याने चूळ भर, दिवसातून किमान दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने आराम मिळेल.
आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात
४. कांदा
दातदुखीचा त्रास होत असेल तर कांद्याचा वापर करूनही आराम मिळतो. यासाठी कांद्याचे तुकडे करून दुखत असलेल्या बाजूला ठेवा आणि त्याच्या चावा, तुम्हाला आराम मिळेल, कांद्याचा रस दात दुखत असेल तर खूप फायदेशीर आहे.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)