World’s happiest countries 2024 : २०२४ चा जागतिक आनंदी देशांचा अहवाल या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्राने (UN) प्रायोजित केलेला ‘वार्षिक जागतिक आनंदी देशांचा अहवाल (World Happiness Report)’बुधवारी (ता. २०) जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, फिनलंडने सलग सातव्या वर्षी जगातील सर्वांत आनंदी देशाचा मान पटकावला आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड व स्वीडन यांचा क्रमांक लागतो. इस्रायलनेही क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.

अफगाणिस्तान आहे सर्वांत कमी आनंदी देश

दरम्यान, काँगो, सिएरा लिओन, लेसोथो व लेबनॉननंतर अफगाणिस्तानला सर्वांत कमी आनंदी देश मानला गेले आहे. २०२० मध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून सतत संकटांचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला सर्वेक्षणातील १४३ देशांच्या यादीत अगदी तळाशी स्थान मिळाले आहे. तर कोस्टा रिका व कुवेत यांनी अग्रस्थानावरील २० आनंदी देशांच्या यादीत १२ वा व १३ वा क्रमांक पटकावला आहे.

Zakir Naik in Pakistan
Zakir Naik : झाकीर नाईकसाठी पाकिस्तानच्या पायघड्या; भेटीसाठी मोठमोठ्या नेत्यांची रांग, पहिलं वक्तव्य भारतातील वक्फ विधेयक व गोमांसावर, म्हणाला..
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Israel Attack on Iran
Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी
Viral Video of Chinese woman shocked by the number of Indians in Canada netizen React
“स्वत: चीनची आहे अन्…” कॅनडामध्ये भारतीयांची संख्या जास्त म्हणणाऱ्या महिलेवर भडकले नेटकरी, पाहा Viral Video
According to chess player arjun Erigesi success comes from not thinking about results
दडपण झुगारणे महत्त्वाचे! निकालांबाबत विचार न केल्याने यश; बुद्धिबळपटू एरिगेसीचे मत
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
five trillion dollar economy
विश्लेषण: रुपयातील घसरणीने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टच अवघड?

टॉप २० च्या यादीतून युनायटेड स्टेट्स व जर्मनीची झाली घसरण

दशकात पहिल्यांदाच अग्र क्रमांकावरील २० आनंदी देशांच्या यादीतून युनायटेड स्टेट्स व जर्मनी या क्रमवारीतून घसरले आहे. युनायटेड स्टेट्स गेल्या वर्षी १६ व्या स्थानावर होता; पण यंदा त्याची २३ व्या स्थानावर व जर्मनीची २४ व्या स्थानावर घसरण झाली आहे. कॅनडा १५ व्या, यूके २० व्या व फ्रान्स २७ व्या स्थानी आहे.

मध्यपूर्वेतील देशांमध्ये यूएई २२ व्या व सौदी अरेबिया २८ व्या स्थानी आहे. आशियाई देशांमध्ये सिंगापूर ३० व्या स्थानावर; तर जपान ५० व्या व दक्षिण कोरिया ५१ व्या स्थानावर आहे.

भारतापेक्षा पाकिस्तान व चीनमधील लोक खरचं आनंदी आहेत का?

अहवालानुसार, भारतीयांपेक्षा चीन आणि पाकिस्तानातील लोक जास्त आनंदी असल्याचे दिसून येते कारण आनंदी देशाच्या अहवालात, भारत १२६व्या स्थानी आहे तर चीन ६०व्या, पाकिस्तान १०८व्या स्थानी आहे. तसेच नेपाळ ९३व्या, म्यानमार ११८व्या, श्रीलंका १२८व्या आणि बांगलादेश १२९व्या स्थानावर आहे.

सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा यादीत समावेश नाही?

१५ दशलक्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नेदरलँड्स व ऑस्ट्रेलियाचा समावेश अवल्ल १० मध्ये झाला आहे; तर ३० दशलक्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कॅनडा व यूके या देशांचा सर्वोच्च २० आनंदी देशांमध्ये समावेश झाला आहे. पण, या देशांचा अपवाद वगळता, सर्वांत आनंदी देशांच्या यादीमध्ये जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा समावेश नसल्याचे अहवालात दिसून आले आहे.

या देशाच्या आनंदाच्या पातळीत झाला बदल

२००६-२०१० पासून आनंदाच्या पातळीत लक्षणीय बदल दिसून आले आहेत. अफगाणिस्तान, लेबनॉन व जॉर्डन या देशांच्या आनंदाच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे; तर सर्बिया, बल्गेरिया व लाटव्हिया यांसारख्या पूर्व युरोपीय देशांच्या आनंदाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

आनंदी देशांच्या अहवालाचे कसे केले जाते मूल्यमापन?

युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कद्वारे दरवर्षी जागतिक आनंदाचा अहवाल प्रकाशित केला जातो. या अहवालात दरडोई उत्पन्न, निरोगी आयुर्मान, विश्वास ठेवण्यासारखे कोणीतरी असणे, जीवननिवडीचे स्वातंत्र्य, दयाळूपणा व भ्रष्टाचार नसणे या सहा घटकांचा विचार केला जातो. २०२१-२३ कालावधीसाठी ‘गॅलप पोल’द्वारे गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सरासरी जीवन मूल्यमापन करण्यात आले आहे.

सलग सातव्या वर्षी फिनलंड सर्वात आनंदी देश कसा ठरला?

फिनलंड सलग सातव्या वर्षी जगातील सर्वांत आनंदी देश ठरला आहे याबाबत हेलसिंकी विद्यापीठातील आनंद विषयावरील संशोधक असलेल्या जेनिफर डी पाओला, सांगतात, “फिनलँडचे निसर्गाशी घट्ट नाते असून आणि येथील लोक काम व वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन ठेवतात. हेच त्यांच्या जीवनातील समाधानासाठी योगदान देणारे प्रमुख घटक आहेत. फिनलँडच्या यशाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन आहे; जो आर्थिक फायद्याच्या पलीकडील पैलूंचे महत्त्व अधोरेखित करतो आणि समाजाच्या कल्याणावर भर देऊन सरकारी संस्थांवरील विश्वास वाढवतो, भ्रष्टाचाराची पातळी कमी करतो आणि सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण पुरवितो.”

वृद्धांच्या तुलनेत तरुणांमध्ये आनंदाची पातळी जास्त

या वर्षीचा अहवाल एक ट्रेंडदेखील दर्शवतो आहे; ज्यामध्ये सामान्यतः वृद्ध वयोगटांच्या तुलनेत तरुण पिढ्यांमध्ये आनंदाची पातळी उच्च आहे. परंतु, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड तरुणांमधील आनंदाची पातळी २००६-२०१० पासून कमी झाली आहे. याउलट मध्य व पूर्व युरोपमध्ये त्याच कालावधीत सर्व वयोगटांतील लोकांच्या आनंदाच्या पातळीत वाढ झाली आहे; तर पश्चिम युरोप पिढ्यान् पिढ्या सातत्याने आनंदाची पातळी वाढत असल्याचे नोंद या अहवाल आहे. हा अहवाल जागतिक स्तरावर आनंदाच्या पातळीत वाढणाऱ्या असमानतेकडे लक्ष वेधतो. विशेषत: वृद्ध व्यक्तींमध्ये आणि Sub-Saharan आफ्रिकेमध्ये उत्पन्न, शिक्षण, आरोग्य सेवा व सामाजिक आधार देणाऱ्या प्रणालींमध्ये असमानता दर्शवितो.

हेही वाचा – तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

जागतिक पातळीवर स्त्रिया पुरुषांपेक्षा आहेत कमी आनंदी

जागतिक स्तरावरही स्त्रिया प्रत्येक प्रदेशात पुरुषांपेक्षा कमी आनंदी आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

या देशातील तरुण आहेत सर्वात जास्त आनंदी

तरुण लोकांमध्ये (३० वर्षे व त्याखालील) आनंदाची क्रमवारी लावताना, लिथुआनिया, इस्रायल, सर्बिया, आइसलँड व डेन्मार्क हे देश पहिल्या पाच क्रमांकांवर आहेत. फिनलँडला या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर भारताला १२७ वे स्थान मिळाले आहे.

या देशातील वृद्ध आहे सर्वात जास्त आनंदी

पण, वृद्ध लोकांमध्ये (६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या) आनंदाच्या क्रमवारीत डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन व आइसलँड हे देश सर्वोच्च क्रमांकावर आहेत तर भारताला १२१ वे स्थान मिळाले आहे.

हेही वाचा – तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

भारत या यादीमध्ये कुठे आहे?

आनंदी देशांच्या क्रमवारीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच भारत १२६ व्या क्रमांकावर आहे. वैवाहिक स्थिती, सामाजिक बंध व शारीरिक आरोग्य यांसारखे घटकदेखील वृद्ध भारतीयांच्या जीवनातील समाधानावर प्रभाव टाकतात. हा अभ्यास भारतातील वृद्धांच्या जीवनातील समाधानावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा विचार करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

भारतातील वृद्ध स्त्रिया पुरुषांपेक्षा आहेत कमी समाधानी

वृद्ध लोकसंख्येमध्ये जागतिक स्तरावर चीनपाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात ६० आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची लोकसंख्या १४० दशलक्ष इतकी आहे. या लोकसंख्यावाढीचा दर देशाच्या एकूण लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा तिप्पट आहे. हे लोकसंख्याशास्त्रीय बदल सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे सूचक आहेत. तरीही वृद्ध लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक समजून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

अहवालात असे आढळून आले आहे की, भारतातील लोक म्हातारपणी (वृद्धापकाळात) खूप जास्त समाधानी असल्याचे दिसून आले आहे. परंतु, भारतातील वृद्ध स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी समाधानी असल्याचे हा अहवाल दर्शवितो.

शिक्षण आणि जातीनुसार आनंदाच्या पातळीतही होतो बदल

या अहवालात शिक्षण आणि जाती या घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि औपचारिक शिक्षण नसलेल्या वृद्ध प्रौढांपेक्षा माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले आणि उच्च सामाजिक जाती असलेले वृद्ध प्रौढ खूप समाधानी असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – K-Popची क्रेझ भारताच्या कानाकोपऱ्यात कशी पसरली? मुर्शिदाबाद ते सोल व्हाया मुंबई…एक प्रवास असाही!

जगभरातील सर्वोच्च १० आनंदी देश

  • फिनलँड
  • डेन्मार्क
  • आइसलँड
  • स्वीडन
  • इस्रायल
  • नेदरलँड
  • नॉर्वे
  • लक्झेंबर्ग
  • स्वित्झर्लंड
  • ऑस्ट्रेलिया

आशियातील सर्वोच्च १० आनंदी देश

  • सिंगापूर
  • तैवान
  • जपान
  • दक्षिण कोरिया
  • फिलिपिन्स
  • व्हिएतनाम
  • थायलंड
  • मलेशिया
  • चीन
  • मंगोलिया.