पाणीपुरी आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय आहे. आपल्या देशातील हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड असून भारतात पाणीपुरी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. जसे की गोलगप्पा, पुचका, पाणी बत्ताशे इत्यादी. मात्र अनेक लोक त्यांच्या कडक डाएट प्लॅनमुळे पाणीपुरी खाणे टाळतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की पाणीपुरी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. परंतु हे खरं आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर आहे. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणीपुरीमध्ये पुदिना, कच्ची कैरी, काळे मीठ, काली मिरी, वाटलेले जिरे आणि मीठ या व्यतिरिक्त आले आणि चिंचेचा वापर केला जातो. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. हे रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करणाऱ्या हानिकारक जीवाणूंना मारण्यास मदत करते. तसेच हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. तर दुसरीकडे, काळ्या मीठात भरपूर खनिजे असतात आणि त्यात टेबल सॉल्टपेक्षा कमी सोडियम असते. हे पचनसंस्था मजबूत करते. याशिवाय, ते त्वचा आणि केसांची गुणवत्ता देखील सुधारते. खडे मीठ स्नायूंमधील क्रॅम्प आणि घास खवखवणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करते.

वर्कआउट करण्यापूर्वी आणि नंतर कसे आणि किती प्रमाणात पाणी प्यावे; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यात जिरे, पुदिना आणि चिंच मिसळले जाते. पुदिन्याचे पाणी आणि जिरे वजन कमी करण्यासाठी ओळखले जातात. पुदिन्याचे पाणी निरोगी जीवनासाठी खूप मदत करते. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. पुदिन्यात फायबर, व्हिटॅमिन ए, लोह, मॅंगनीज आणि फोलेट देखील असतात. पाणीपुरी खाल्ल्याने तोंडाचे व्रण आणि आम्लपित्तही टाळता येते. तसेच, हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील पाणीपुरी फायदेशीर ठरू शकते.

खबरदारीही महत्त्वाची

बिअरच्या बॉटल्स फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण

सामान्यतः या पुऱ्या ट्रान्स फॅटमध्ये बनवल्या जातात, त्यामुळे त्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच रव्यापासून बनवलेली पाणीपुरी टाळण्याचा प्रयत्न करा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली पाणीपुरी खा. याशिवाय त्यात बॅक्टेरिया असल्याने डायरियाची समस्या होऊ शकते. जिरे पावडरचा जास्त वापर केल्याने मासिक पाळीत त्रास जाणवू शकतो. पाणीपुरी बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. स्वच्छतेचे भान ठेवून तयार केलेली पाणीपुरी पोषक तत्वांनी परिपूर्ण असू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pani puri good for weight loss here is an interesting fact pvp