निरोगी शरीरासाठी सकस आहार खूप आवश्यक असतो. या आहारात योग्य प्रमाणात डाळ, भात, भाजी, चपातीसोबतच फळं, द्रव पदार्थ गरजेचे असतात. पण सकस आहारासोबत योग्य व्यायाम केल्या वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते. यात आहारात फळं देखील तितकीचं महत्वाची भूमिका बजावतात. यात पपई हे एक फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. औषधी गुणधर्मांनी समृद्धी पपईचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पपई हा आरोग्यासाठी पोषक गुणधर्मांचा खजिना आहे. यामुळे पपई हे एक फळ असले तरी त्याचे शरीरासाठी फायदे अनेक आहेत.
पपईच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात. पपईच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे झाल्यास, त्यात प्रोटीन कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट पदार्थ, अक्लधर्मी घटक, लोह हे घटक आहेत. पपई हे मऊ फळ असून जे पचनासाठी फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पपई गुणकारी आहे.
पपईत ८९.६ टक्के पाणी असते, जे शरीरास हायड्रेट ठेवते आणि पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, पपईत असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे विविध आजारांवर फायदेशीर मानले जातात. जाणून घेऊ पपईचे फायदे…
पचनक्रिया सुधारते
पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. त्यातील पपेन या पाचक एन्झाइम घटकामुळे पचनास मदत होते. याचे सेवन केल्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि एॅसिडिटीसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात.
आतड्यांमधील घाण साफ होते.
पपईने पचनक्रिया सुधारते तसेच आतड्यांमधील घाण साफ होते. यातील पपेन एन्झाएम घटक पचनासाठी गॅस्ट्रिक एॅसिडच्या स्त्रावला प्रोत्साहन देतात. यामुळे शरीरातील घाण काढून टाकण्यासाठी पपईचे सेवन खूप प्रभावी असते. याचे सेवन केल्याने श्लेष्मा आणि आतड्यांमधील जळजळीपासून आराम मिळतो.
वजन नियंत्रणात राहते.
पपईच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यात कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे खाण्यावर नियंत्रण राहते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पपई खूप प्रभावी ठरते.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
केवळ पपईचं नाही तर त्यातील बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पपईचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात राहते . यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. फायबरने समृद्ध, पपई पाचन तंत्र निरोगी ठेवते.