Papaya Health Benefits In Marathi : मार्केटमध्ये उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात पपई हे फळ जास्त प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे हिवाळ्यात हे फळ अतिशय स्वस्त दरात तुम्हाला सहज मिळून जाते. त्यामुळे तुम्ही यादरम्यान त्याचे भरपूर सेवन करू शकता. पण, पपईमध्ये असे कोणते पोषक घटक आहेत; ज्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन केले पाहिजे. तर, हे फळ तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे (Papaya Health Benefits) . कारण- यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

… तर पपई गरम असते की थंड?

पपई हे उष्ण प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे याच्या सेवनाने शरीर आतून उबदार राहते वा शरीरात उष्णता निर्माण होते आणि पचनसंस्था, यकृत, आतडे हे अवयव व्यवस्थित कार्यरत राहून, शरीरातील सर्व विषाक्त पदार्थ बाहेर टाकले जातात. या महत्त्वपूर्ण बाबींमुळे तुमच्या लक्षात आले असेल की, हिवाळ्यात उष्ण प्रकृतीची पपई खाणे किती आरोग्यदायी आहे.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

पुढील काही आरोग्य समस्यांवर पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरेल (Papaya Health Benefits)

पोटाच्या सर्व आजारांवर उपचार :

पपईचा अपचन, छातीत जळजळ, ॲसिड रिफ्लक्स, पोटातील अल्सर यांसह पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापर केला जातो. हा आहारातील फायबरचा समृद्ध स्रोत आहे, जो आपल्या पचनसंस्थेला गती देतो. पपईमध्ये पपईन (papain) नावाचे पाचक सुपर एन्झाइमदेखील असते. हे एक प्रथिने विरघळणारे एन्झाइम आहे, जे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, आतड्यांसंबंधीची समस्या, यकृत व पोटाच्या समस्या कमी करण्यात साह्यभूत ठरते.

हेही वाचा…वजन कमी करायचंय आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा हवाय? मग वाचा Rujuta Diwekar च्या ‘या’ तीन टिप्स

दमेकऱ्यांसाठी फायदेशीर :

पपईमधील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन फुप्फुसातील जळजळ कमी करण्यास मदत करते. धूम्रपान करणाऱ्यांसाठी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. कारण- पपईचा रस फुप्फुसातील जळजळ कमी करतो आणि दम्याचा त्रास टाळतो.

हाडांच्या सुदृढतेसाठी उपयुक्त :

पपई हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हे संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिसविरुद्ध प्रभावी मानले जाते. पपईमध्ये आढळणारे एक एन्झाइम, ज्याला chymopapain म्हणतात, ते हाडांची घनता आणि ताकद वाढवण्यास मदत करते. अशा प्रकारे पपईचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Story img Loader