Benefits of Papaya Leaf Water : अनेक लोक घरी आवडीने पपईचे झाड लावतात आणि पपईचा आस्वाद घेतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पपई खूप आवडते. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहितेय का, फक्त पपईच नाही, तर या झाडाची पानेसुद्धा तितकीच पोषक असतात; जी आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यास मदत करतात. पपईच्या पानांचे पाणी आरोग्यास कसे फायदेशीर आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पपईच्या पानांचे पाणी किती प्यावे?

Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, आठवड्यातून तीनदा फक्त एक कप पपईच्या पानांचे पाणी प्यावे, असा सल्ला दिला जातो. पण, या पाण्याचे सेवन प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून आहे. पपईच्या पानांचे पाणी घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तुम्ही योग्य प्रमाणात ते घेत आहात का, याची खात्रीसुद्धा करावी.

पपईच्या पानांचे पाणी आरोग्यासाठी कसे फायदेशीर ते जाणून घेऊ या.

प्लेटलेट्सची संख्या वाढवते

पपईच्या पानांचे पाणी डेंग्यूच्या आजारांचा सामना करण्यास फायदेशीर आहे. या पाण्याच्या सेवनाने डेंग्यूमध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत मिळते. जेव्हा एखाद्याला डेंग्यूचा आजार होतो तेव्हा प्लेटलेट्सच्या संख्येत झपाट्याने घट होते. पण, पपईच्या पानांचे पाणी नियमित सेवन केल्यास डेंग्यूचा रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात

पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई व फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर ठेवतात. पपईच्या पानांचे पाणी नियमित प्यायल्याने पेशी खराब होत नाहीत. या पानांच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स हृदयविकार, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते

पपईच्या पानांचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. त्याशिवाय जळजळ कमी होते आणि आतड्यातील निरोगी जीवाणू वाढतात

सांधेदुखी व स्नायूदुखी दूर होते

पपईच्या पानांच्या पाण्यात अल्कालॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखी संयुगे असतात, जी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे सांधेदुखी, स्नायूदुखी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.

यकृताचे निरोगी आरोग्य

शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास (डिटॉक्सिफिकेशन), पोषक घटकांचे चयापचय करण्यास आणि विविध शारीरिक कार्यांचे नियमन करण्यात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते.
पपईच्या पानांमध्ये एसिटोजेनिन्स असतात, जे यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. या पानांच्या पाण्यामुळे यकृताची कार्यक्षमता वाढते.

त्वचेचे आरोग्य सुधारते

पपईच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे उदा. व्हिटॅमिन ए व सी निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे खराब झालेल्या त्वचेच्या पेशींमध्ये सुधारणा होते. पपईच्या पानांच्या पाण्यात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल व अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील काळे डाग, पुरळ दूर करतात.

मधुमेहासाठी फायदेशीर

पपईच्या पानांचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करतात. अभ्यासातून असेही दिसून आले आहे, की पपईच्या पानांचे पाणी एकुण ग्लुकोजची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. याचा फायदा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो.

केसांची वाढ होते

पपईच्या पानांचे पाणी केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पपईच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह यांसारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे केस गळणे कमी होते आणि केस पांढरे होत नाहीत.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

पपईच्या पानांचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. या पानांच्या पाण्यात पोषक घटक; जसे की जीवनसत्त्वे ए, सी व ई भरपूर प्रमाणात असतात. पपईच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. या पानांचे पाणी नियमित प्यायल्याने तुम्ही स्वत:ला आजारांपासून वाचवू शकता.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात

पपईच्या पानांचे पाणी एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे पाणी यकृत आणि किडनीद्वारे हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते; ज्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत पार पडते.