आपल्या पूर्ण दिवसाच्या दिनचर्येत आपण अनेक प्रकारची कामे करत असतो. त्यामध्ये नाश्ता, जेवण आणि अन्य गोष्टींचा समावेश होतो. असे म्हटले जाते की सकाळी केलेला नाश्ता असा असावा की तो तुम्हाला पूर्ण दिवसभर ऊर्जा देईल. सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारचे जेवण सकाळी केलेल्या नाश्त्यापेक्षा थोडे कमी आणि रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा कमी करावे असे सांगितले जाते. त्यामुळे शरीराला फायदा होण्याची शक्यता असते. मात्र आपण सकाळी करत असलेल्या नाश्त्यामध्ये असे अनेक पदार्थ असतात ज्याची चव उत्तम असते मात्र ते तितकेच तेलकट देखील असतात.
आपल्याला असे वाटत की हे पदार्थ खाऊन आपले पोट भरण्याबरोबरच आपल्याला ऊर्जा मिळेल असे वाटते. मात्र कधीकधी होते उलटेच. छोले भटुरे आणि अन्य पदार्थांचा यात समावेश आहे. असे अनके पदार्थ आहेत जे सकाळी नाश्त्यामध्ये भारतात घरोघरी केले जातात पण हे पदार्थ शरीरासाठी इतके चांगले नसतात जितके आपल्याला वाटतात. जे आपल्या वाढत्या वाजनामुळे त्रस्त आहेत अणि वजन कमी करण्याचा पर्यटन करत आहेत त्यानी या गोष्टी नाश्त्यात टाळल्या पाहिजेत. ते अधूनमधून खाण्यात काही नुकसान नाही, परंतु दररोज ते खाणे टाळणे आवश्यक आहे.
बटाट्याची भाजी आणि पुरी
बऱ्याचदा अनेक घरांमध्ये नाश्त्याला चविष्ट बटाट्याची भाजी आणि पुरी केली जाते. परंतु, या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात च्युरेटेड फॅट्स असतात आणि त्यामध्ये भरपूर कॅलरी देखील असते. जर तुम्ही रोज सकाळी बटाट्याची भाजी आणि पुरी खाल्ली तर तुम्हाला लठ्ठपणा, क्तदाब, ऍसिडिटी आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या होऊ शकतात.
जिलेबी फाफडा
टीव्हीवर नवनवीन पदार्थांच्या रेसीपीचे शो दाखवले जातात. ते पाहून आपल्या घरात ते देखील पदरात तयार केले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे जिलेबी फाफडा. या पदार्थामध्ये साखर आणि फॅट्स दोन्ही असतात. ते आरोग्यासाठी चांगले नाही. फाफडा हा एक प्रकारचा तळलेला पापड आहे. तर जिलेबीमध्ये साखर मिसळलेली असते. त्यामुळे जास्तीत जास्त हा पदार्थ नाश्त्यामध्ये खाणे टाळल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
वडा पाव
वडा पाव हा नाश्ता महाराष्ट्रातील घरोघरी केला जातो. मुंबईचा वडापाव तर जगप्रसिद्ध आहे. आता देशाच्या अनेक भागांमध्ये वडा पाव हा पदार्थ नाश्त्यामध्ये खाल्ला जातो. वडा हा बेसन पीठ आणि बटाट्यापासून बनलेला पदार्थ आहे. तसेच पाव हा मेदाचा तयार केलेला असतो. या पदार्थामध्ये जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे हा पदार्थ रोज नाश्त्यामध्ये खाणे टाळल्यास फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा : पालकांनो, मुलं अभ्यास करत नाहीत? अभ्यासाची गोडी लावण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
पराठे
भारतात घरोघरी नाश्त्यामध्ये अनेक प्रकारचे पराठे केले जातात . त्यात बटाट्याचे पराठे, कोबीचे पराठे, तर कधीकधी मुळ्याचे पराठे तर कधी पनीरचे पराठे या पदार्थानी सकाळची सुरुवात होते. पराठे तसे शरीरासाठी आरोग्यदायी असतात, पण जर ते भरपूर तेल घालून बनवले गेले तर ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतात.
नूडल्स
आजकालची तरुण पिढी नाश्त्यामध्ये मॅगी अन्य प्रकारचे नूडल्स खाऊन करतात . नूडल्स चविष्ट असतात तसेच ते खाऊन पोट देखील भरते. मात्र नूडल्स हे मैद्यापासून तयार केलेले असतात. तसेच ते ओट्स किंवा मैदा यापासून तयार केले असले तरी जास्त प्रमाणात किंवा रोज नूडल्स खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)