Parenting Mistakes: पालकांना त्यांच्या मुलांच्या हिताची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे आणि त्यांनी जे स्वप्न पाहिले ते सर्व साध्य करावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु अनेकदा पालक आपल्या मुलाला सर्व काही मिळावे या इच्छेने अतिसंरक्षणात्मक(Over protective) होतात. ते त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतात पण त्यामुळे पालक मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकू देत नाहीत. इतकेच नाही तर काही वेळा पालक स्वतःच मुलाच्या आयुष्याचे निर्णय घेतात आणि त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत. परिणामी, असे पालक स्वतःच्या मुलाच्या विकासात अडथळा ठरतात आणि त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत नाही.
Self-SufficientKid च्या म्हणण्यानुसार, जर पालकांनी आपल्या मुलाच्या आयुष्याचा निर्णय घेतला किंवा प्रत्येक निर्णय स्वतः घेतला तर ते त्यांच्या निर्णय क्षमतेत अडथळा आणतात आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो. त्यामुळे पालकांनी पराभवाच्या भीतीतून बाहेर पडून स्वत:च्या पराभवातून शिकण्याची संधी दिली पाहिजे.
हेही वाचा – किशोरवयीन मुलांमध्ये होतात खूप Mood swings; अशावेळी मुलांबरोबर पालकांनी कसे वागावे? जाणून घ्या
मुलांना अस्वस्थ होताना, हरताना किंवा अपयशी होताना पाहणे पालकांसाठी एक कठीण काळ आहे, परंतु या भावनांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी ढाल व्हाल तर ते भविष्यात त्यांच्या वाईट काळाला सामोरे जाऊ शकत नाही. मुलांना अशा वेळी समस्येला तोंड देताना प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यांना प्रशिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तर बरे होईल.
तथापि, ज्याप्रमाणे अनेक पालक आपल्या मुलाच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करत असतात, त्याचप्रमाणे त्यांना जास्त स्वातंत्र्य देणे देखील चुकीचे ठरू शकते. म्हणूनच घरी त्यांची दिनचर्या आखा, त्यांना घराबाहेरची काम सांगा आणि शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवा.
काही पालक आपल्या मुलांची सर्व कामे स्वतःच करतात. परंतु तुम्ही त्यांना त्यांचे स्वतःचे काम करण्यास प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. त्यांना लहानपणापासून शिकवा की ते स्वतःचे काम कसे करू शकतात. त्यांना त्यांचे गृहपाठ करणे, पुस्तके नीट ठेवणे, खोली स्वच्छ ठेवणे, इत्यादी कामे द्या. अशा प्रकारे ते जबाबदारी घेण्यास आणि चांगले काम करण्यास ते शिकतील.