How to Handle Hyper active Child: काही मुलं सर्व सामान्य मुलांपेक्षा भिन्न असतात आणि त्यांची हालचाली, वागणूक इतर मुलांपेक्षा वेगळी असते. यामागचे कारण आहे त्यांना अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) असू शकतो. अशा मुलांना कशाप्रकारे सांभाळावे याची माहिती डॉक्टर तुम्हाला चांगल्याप्रकारे सांगू शकतात. हेल्थलाइन डॉट. कॉमनुसार, काही सोप्या पद्धती वापरून पाहू शकता आणि मुलांना शांत करू शकता.

एडीएचडी म्हणजे काय:
सर्वप्रथम जाणून घेऊ या की अटेन्शन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) म्हणजे काय. एडीएचडी म्हणजे मुलांचे लक्ष न लागणे आणि गरजेपेक्षा जास्त सक्रिय असणे (हायपरॅक्टिव्हिटी), हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये मूल शांतपणे कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते खूप बोलतात किंवा सतत बोलत राहतात. त्यामुळे, मूल पटकन त्याचा निंयत्रण गमावतात. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मुलावर उपचार केले जातात. अशा परिस्थितीत, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

हेही वाचा – रेस्टारंटने बिलावर लिहिली होती शिवी; ग्राहकाने तक्रार केल्यानंतर आले खरे कारण समोर

संवेदनशील व्हा:
पालकांनी मुलांबाबत नेहमी संवेदनशील असले पाहिजे. तसेच हायपरॅक्टिव्हिटी मुलांना शांत ठेवण्यासाठी घरातील वातावरण चांगले ठेवा. ADHD असलेली मुले या प्रकारच्या वातावरणात शांत असतात. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक गोष्टीसाठी नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण असे न केल्याने मूल जास्त हायपर होऊ शकते. तर, गोष्टींचे निरीक्षण केल्याने तुमच्या मुलाला त्याची अतिक्रियाशीलता नियंत्रित करणे शक्य होते.

गृहपाठ विभागून करून द्या.
एडीएचडीने ग्रस्त असलेल्या मुलाने काही काळ शांत बसून राहावे अशी अपेक्षा करणे त्यांना असंवेदनशील बनवू शकते. अशा परिस्थितीत, आपण त्यांच्या कामांचे,गृहपठाचे काही भागात विभागाने केले तर चांगले होईल, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. जर तुमचे मूल काही मिनिटांसाठीच गृहपाठ करू शकत असेल. त्याला जे काम आरामात आणि सहज करता येईल ते करायला सांगा. त्यानंतर तीन मिनिटांचा ब्रेक द्या आणि मग गृहपाठ करायला सांगा. त्याच पद्धतीने पुढील काम सुरू ठेवा.

बक्षीस द्या
अतिक्रियाशील मुलाला प्रेमाने हाताळा. जेव्हा तुमचे मूल एखादे काम निर्धारित वेळेत पूर्ण करते, तेव्हा त्याला बक्षीस द्या. त्याचे कौतूक करा. यासाठी तुम्ही त्याला मिठी मारावी, प्रोत्साहन द्यावे किंवा त्याच्यासाठी एखादी कविता किंवा असे काही तरी करावे लागले ज्यामुळे त्याला आनंद मिळेल. अशाप्रकारे, मूल ते काम आणखी चांगले होण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा – नारळापासून कशी बनवतात जेली; अचंबित करणारा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाच …

कामाच्या आधी खेळण्याची परवानगी द्या:
मुलाला शांत ठेवण्यासाठी, त्याला कोणतेही काम देण्याआधी काही वेळ खेळायला आणि अॅक्टिव्हिटी करू द्या. खरं तर, जर मूल शांतपणे बसले तर त्याची उर्जा दडपून राहते, जी मुलांसाठी वापरणे महत्वाचे आहे. हे मुलाला कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करेल, म्हणून मुलाला अशा अक्टिव्हिटी करू द्या ज्यासाठी काही शारीरिक श्रम करावे लागतील. यानंतर, मूल कोणतेही काम करण्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढू शकते.

मुलाला मदत करा:
तुमच्या मुलाला विश्रांतीचे तंत्र समजावून सांगा. यासाठी तुम्ही खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम, स्नायू शिथिल करणारे व्यायाम, माइंडफुलनेस मेडिटेशन, ध्यान आणि योगासने यासारख्या गोष्टींची मदत घेऊ शकता. अशा प्रकारे, मुलाला त्याचे शरीर, भावना, वागणूक आणि अतिक्रियाशीलता समजून घेण्यात मदत मिळू शकते.