लहान मुलांसाठी त्यांचे कुटुंब हेच त्यांचे विश्व असते. त्यामुळे जेव्हा त्यांना बाहेरच्या जगात पाऊल ठेवावे लागते. तेव्हा अनेक लहान मुलांना अनोळखी माणसं, जागा यांची भीती वाटते. कुटुंबातील सुरक्षित वातावरणाची या मुलांना इतकी सवय झालेली असते की बाहेरचे जग त्यांना भीतीदायक वाटते. ही समस्या आपल्या मुलांना होऊ नये यासाठी काही पालक मुलांचा शाळेत प्रवेश होण्याआधीच त्यांना या नव्या जगाची कल्पना देतात, त्यांना समजावून सांगतात. पण तरीही काही मुलांना अनोळखी लोकांशी बोलताना भीती वाटते त्यांच्यामध्ये बोलताना आत्मविश्वास दिसत नाही. मुलांनी अधिक आत्मविश्वासाने सर्वांशी बोलावे यासाठी काही टिप्स मदत करू शकतात कोणत्याही त्या टिप्स जाणून घ्या.
मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टी करतील मदत
Health Tips : ‘या’ खाद्यपदार्थांमुळे वाढतो Type 2 Diabetes होण्याचा धोका
मुलांना कुटुंबा व्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यासाठी प्रोत्साहन द्या
मुलांना ओळखीच्या माणसांबरोबर बोलायला किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. पण त्यांच्या मानसिक विकासासाठी घराबाहेरील जगाशी संवाद साधता येणे गरजेचे आहे त्यासाठी मुलांना कुटुंबव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यासाठी प्रोत्साहन द्या. जर मुलांना स्वतः कुठेही जाण्यात रस वाटत नसेल, तर पालकांनी स्वतः त्यांच्याबरोबर समारंभांना हजेरी लावावी. यामुळे त्यांना अनोळखी लोकांशी कसे बोलायचे, अशा ठिकाणी कसे वागायचे याची सवय होईल.
मुलांना बोलण्याची सवय लावा
बहुतांश मुलांना त्यांना काय हवे आहे किंवा त्यांना कशाचा त्रास होत आहे का हे उघडपणे सांगता येत नाही कारण त्यांना व्यवस्थित व्यक्त होता येत नाही. अर्थात लहान वयात व्यक्त होणे कठीण असते, पण तुम्ही जर मुलांना सतत बोलण्याची सवय लावली, प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लावली तर त्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो.
आणखी वाचा : लहान मुलांना घरी एकटं ठेवण्यापुर्वी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या
मैत्रीचे महत्त्व समजवा
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपण जी गोष्ट कुटुंबातील व्यक्तींना सांगू शकत नाही ती मित्रांना सहज सांगू शकतो. तसेच आपल्या वयातील मुलांबरोबर सर्व गोष्टी शेअर करणे सहज शक्य होते, त्यामध्ये एक वेगळा कम्फर्ट तयार होतो. त्यामुळे मुलांना मैत्रीचे महत्त्व समजवा.
या टिप्ससह गोष्टी शेअर करायला शिकवणे, इतरांची चुकी झाली तरी शांत राहणे, घराबाहेर कसे वागावे अशा छोट्या गोष्टी लहान मुलांना नीट शिकवल्या तर त्याचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो.