लहान मुलांची वाढ नीट व्हावी यासाठी सगळे पालक चिंताग्रस्त असतात. यातच आपल्या मुलांची उंची वयानुसार योग्य असावी, इतर मुलांपेक्षा त्यांची उंची कमी असु नये यासाठी पालक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मुलांना व्यायाम करायला लावणे, त्यांना उंची वाढवण्यासाठी मदत करणारी पावडर किंवा औषधं देणे असे अनेक प्रयत्न पालक करतात. मुलांची उंची वाढवण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थ देखील मदत करू शकतात. कोणते आहेत असे पदार्थ ज्यांचा समावेश रोजच्या जेवणात केल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत मिळु शकते जाणून घ्या.
मुलांच्या जेवणात या गोष्टींचा करा समावेश:
हिरव्या भाज्या
मुलांची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी त्यांना योग्य पोषण मिळणे आवश्यक असते. यासाठी त्यांच्या जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. जर लहान मुलांना भाज्या आवडत नसतील तर त्या बनवताना त्यात लहान मुलांना आवडेल असा ट्विस्ट देऊन त्यांना चविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
अंडी
अंड्यामध्ये प्रोटिन, फॅटी ऍसिड असते जे मुलांच्या शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. यासह यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम देखील आढळते, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. म्हणून मुलांच्या रोजच्या जेवणार अंडयांचा समावेश करावा. अंड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना देता येतील.
दही
दह्यामध्ये विटामिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. जे मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि त्यांची उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच यामध्ये प्रोबायोटिक्स आढळते जे पोटाचे आरोग्य नीट ठेवण्यास मदत करते. यामुळे मुलांच्या रोजच्या जेवणात त्यांच्या आवडीनुसार दह्याचा समावेश करावा.
आणखी वाचा: हाताने जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित; आरोग्यासाठी कसे ठरते फायदेशीर जाणून घ्या
दुध
प्रत्येक लहान मुलासाठी दिवसभरात किमान एक ग्लास दुध पिणे अत्यंत आवश्यक आहे. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन डी आणि प्रोटीन आढळते. यामुळे मुलांच्या शारीरिक विकासासाठी मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)