Parenting Tips : मुले मोठे झाल्यानंतर त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि व्यवहार कसा असणार, हे अनेकदा बालपणी त्यांना आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर अवलंबून असते. त्यामुळे पालक आपल्या मुलांना नेहमी चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. पालकांना नेहमी वाटतं की, त्यांच्या मुलांनी आत्मविश्वासू असावं आणि कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण केले पाहिजे; पण मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि त्यांना जबाबदार कसे बनवायचे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
जेलीफिश पॅरेंटिंग
‘जेलीफिश पॅरेंटिंग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही एक संगोपनाची स्टाइल आहे, जी अनोख्या पद्धतीने मुलांना अनेक गोष्टी शिकवते. या संगोपन प्रकारात पालक खूप शांत असतात आणि मुलांना त्यांचे निर्णय स्वत: घेण्यासाठी स्वातंत्र्य देतात. पण, भारतात संगोपनाचा हा प्रकार पाळला जातो का? आणि भारतीयांसाठी हा प्रकार योग्य आहे का?
‘जेलीफिश पॅरेंटिंग’ खूप फ्री आहे. या संगोपनात कोणतेही बंधन लादले जात नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार मुले स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यासाठी सक्षम बनतात. या संगोपन प्रकारात पालक मुलांना योग्य दिशा दाखवतात. त्यांना चुकांपासून शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विशेष म्हणजे यामध्ये मुलांना पालकांकडून भावनिक आधार मिळतो आणि पालक आणि मुलांमध्ये घट्ट नाते निर्माण होते. त्यामुळे ‘जेलीफिश पॅरेंटिंग’ स्वीकारणे काहीही चुकीचे नाही. भारतीयांनी संगोपनाचा हा प्रकार फॉलो करायला पाहिजे.
हेही वाचा : Saree : स्त्रियांना भुरळ घालणाऱ्या साड्यांचा इतिहास माहीत आहे? जाणून घ्या साड्यांची उत्पत्ती कशी झाली?
भारतात मुलांचे संगोपन कसे केले जाते?
भारतात मुलांचे संगोपन समाज, कुटुंब आणि शिस्तप्रिय पद्धतीने केले जाते. भारतात “ऑथोरिटेरियन पॅरेंटिंग”ला अधिक महत्त्व आहे. यामध्ये मुलांचे भरपूर निर्णय पालक घेतात आणि मुलांसाठी कडक नियम बनवतात. जर एकत्र कुटुंब असेल तर घरातील अन्य सदस्यांचेसुद्धा मुलांच्या संगोपनात तितकेच जास्त योगदान असते.