Parenting Advice: मुलांसाठी आई-वडील सर्व काही करतात. त्यांना जन्म देण्यापासून, त्यांचे शाळेत पहिले पाऊल टाकण्यापासून ते आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वकाही करतात. कधी मुलांचे पोटं भरण्यासाठी आई स्वत:च्या वाटणीची चपातीही लेकराला देते तर वडील मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी स्वत:साठी नवीन वस्तू खरेदी करत नाही. आईवडील मुलांसाठी भरपूर कष्ट करतात. आयुष्यात असे कित्येक छोटे छोटे त्याग करतात पण मुलं मोठी झाली की सर्व काही विसरून जातात आणि मुलांनी फक्त त्याच गोष्टी लक्षात राहतात ज्यात आई-वडील अयशस्वी ठरतात. एवढंच नाही तर मुलं अनेकदा आई-वडीलांनी असंही म्हणतात की, तुम्ही आमच्यासाठी केलंच काय? मुलांचे अशी वर्तणूक तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताना केलल्या काही चुकांचा परिणाम असू शकतो म्हणूनच मुलांना लहानपणीपासूनच अशा गोष्टी शिकवल्या पाहिजे जो मुलांना आई-वडीलांचा त्याग आणि प्रेमाचा सन्मान करतात आणि नेहमी त्याची जाणीव ठेवतात.

मुलांना कृतघ्न होऊ देऊ नका
मुलांना आई-वडीलाच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी त्यांना लहानपणीपासून नैतिक मुल्य जपायला शिकावा आणि त्यांचे महत्त्व पटवून द्या पण पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केल हे सांगून त्यांच्या मनावर ओझं निर्माण करू नका. त्यामुळे मुलं चिडचिडी होतात. मुलांना चांगल्या गोष्टी नैसर्गिकपणे शिकवल्या जातात , त्यांच्यावर या गोष्टी लादू नका.

Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
Father Arrested for sexual Abusing 10 Year Old Daughter
वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा, काय घडले?
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
argument in the relationship between brothers and sisters
भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?
mp honour killing
Madhya Pradesh : धक्कादायक! परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून बापाने केली स्वत:च्या मुलीची हत्या
self-reliance, school play, responsibility, vegetables, family values, loksatta balmaifal
बालमैफल: सोनाराने टोचले कान

मुलांना तुमचा वेळ द्या
मुलांसाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा आई-वडीलांसह घालवलेला वेळ जास्त महत्त्वाचा असतो. मुलांना तुमचा वेळ द्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहचवा. मुल जेव्हा आई-वडीलांसह चांगला वेळ घालवतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होते जे त्यांचे आई-वडीलाचे प्रेम आणि त्यांच्या त्यागाची जाणीव करून देते. मुलं नेहमी आपल्या आई-वडीलांना चांगल्या प्रकारे समजू शकतात.

हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीमध्ये फराळावर ताव मारताय? आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

मुलांना पैशांचे महत्त्व शिकवा
असे अनेक पालक असतात ज्यांच्या घरात पैशांची कसलीच कमतरता नसते. पण मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट देण्याच्या नादात मुलांना पैशाची महत्त्वच कळत नाही त्यामुळे मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्या पालकांनी किती कष्ट करून, किती त्रास सहन करून आयुष्यात असे ऐशो-आरामाचे आयुष्य मिळवले आहे हे त्यांना कधीही समजत नाही.

कधीही मेहनत न करणे
जेव्हा मुलं कोणतेही कष्ट न करता आपले आयुष्य घालवतात तेव्हा त्यांना हे केव्हाही समजत नाही की त्यांच्या आई-वडीलांना त्यांना मोठे करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागते त्यामुळे मुलांना लहानपणीपासूनच कष्ट करण्याची शिकवण द्या. पॉकेट मनी तेवढीच द्या जेणेकरून त्यांच्या गरजा पूर्ण होतील. मुलांना घरातील काम करायला सांगा. आजी-आजोंबाची मदत करायाला शिकवा आणि तुम्हाला पॉकेट मनी द्या. मुलं मोठे होतात तेव्हा उन्हाळी वर्गात सहभागी व्हायला शिकवा.

हेही वाचा – Diwali 2023 : दिव्यात तेल नव्हे, पाणी टाका! पाणी वापरून कसे काय लावतात दिवे? जाणून घ्या हटके जुगाड

दुसऱ्यांना समजून घ्यायला शिकवा
मुलांना लहानपणीपासून शिकवा की जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या जागी असेल तर त्याला कसे वाटेल. इतरांच्या दुख समजून घ्यायला शिकणे असा गुण आहे जो अनेकांमध्ये नसतो. मुलांना जेव्हा सन्मान करायला आणि समुजदारपणा शिकतो तेव्हा आई-वडीलांकडून आयुष्यभर जे काही मिळाले आहे त्याची जाणीव ठेवतात.