Parenting Advice: मुलांसाठी आई-वडील सर्व काही करतात. त्यांना जन्म देण्यापासून, त्यांचे शाळेत पहिले पाऊल टाकण्यापासून ते आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत सर्वकाही करतात. कधी मुलांचे पोटं भरण्यासाठी आई स्वत:च्या वाटणीची चपातीही लेकराला देते तर वडील मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी स्वत:साठी नवीन वस्तू खरेदी करत नाही. आईवडील मुलांसाठी भरपूर कष्ट करतात. आयुष्यात असे कित्येक छोटे छोटे त्याग करतात पण मुलं मोठी झाली की सर्व काही विसरून जातात आणि मुलांनी फक्त त्याच गोष्टी लक्षात राहतात ज्यात आई-वडील अयशस्वी ठरतात. एवढंच नाही तर मुलं अनेकदा आई-वडीलांनी असंही म्हणतात की, तुम्ही आमच्यासाठी केलंच काय? मुलांचे अशी वर्तणूक तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताना केलल्या काही चुकांचा परिणाम असू शकतो म्हणूनच मुलांना लहानपणीपासूनच अशा गोष्टी शिकवल्या पाहिजे जो मुलांना आई-वडीलांचा त्याग आणि प्रेमाचा सन्मान करतात आणि नेहमी त्याची जाणीव ठेवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा