Ways to Teach Kids to Finish Meal: लहान मुलांना जेवायला देणं किंवा खायला घालणं म्हणजे आई-वडिलांसमोर मोठा टास्कच असतो. मुलांच्या जेवणाची वेळ झाली की आई-वडिलांना त्यांना भरवायचं कसं हे टेन्शन येतं. त्यामुळे आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना जेवताना मोबाईल किवं टिव्ही लावून देतात. लहान मुलांना टीव्ही किंवा फोन पाहण्याचे इतके व्यसन लागले आहे की ते टीव्ही पाहिल्याशिवाय जेवतच नाहीत. मुलांचा हट्टीपणा पाहून पालकही त्यांना टीव्ही किंवा मोबाईल देतात. जर तुम्हीही तुमच्या मुलाच्या या सवयीमुळे हैराण असाल आणि ती बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
एकत्र बसून खायला देण्याचा प्रयत्न
हल्लीच्या मुलांना बाहेरचे पदार्थ खूप आवडतं. त्यामुळे सहाजिकच त्यांना घरचे जेवन नकोसे वाटू लागते. अशावेळी जेवण्यास नकार देणा-या मुलाच्या काळजीपोटी किंवा त्यांच्या शरीराला पोषक तत्वे मिळावीत म्हणून आई-वडील जबरदस्ती त्यांना जेवण भरवू लागतात. पालक स्वत:च निर्णय घेतात की मुलाला कोणता आहार आणि किती प्रमाणात खाल्ला पाहिजे आणि त्यानुसार त्याला जबरदस्ती करु लागतात. ज्यामुळे ते त्यांना फोन किंवा टीव्ही पाहण्याची परवानगी देतात. पण असे न करता त्यांना एकत्र बसून खायला देण्याचा प्रयत्न करावा. मुलांना एकटं जेवायला आवडत नाही त्यामुळे त्यांना टीव्ही पाहताना खाण्याची सवय लागते. ही सवय सोडवण्यासाठी मुलांना सोबतच जेवण्याची सवय लावा. मोठ्यांना पाहून मुले खूप लवकर शिकतात. टीव्ही न पाहताही ते सहज जेवण करतात.
भूक आणि आहाराची ओळख
तुमच्या मुलाला तेच अन्न द्या जे कुटुंबातील इतर सदस्य खातात किंवा तुम्ही खात आहात. यामुळे त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत सहजपणे जेवण करण्याची सवय लागण्यास मदत होईल. मुलाला जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न करू नका.मुलाला त्याची भूक आणि आहार ओळखण्याची संधी द्या. अनेक वेळा टीव्ही पाहताना मुलांना जेवायला आवडत नाही, अशा परिस्थितीत पालक त्यांना जबरदस्तीने खायला घालू लागतात, त्यामुळे मुले हट्टी होऊ शकतात.
मुलांच्या आवडीचे जेवण बनवा
जर तुम्हाला तुमच्या मुलाने त्याच्या ताटातील संपूर्ण अन्न संपवल्यानंतरच उठवायचे असेल, तर पहिली टीप तुमच्यासाठी आहे की मुलाच्या आवडीचे जेवण बनवा. उदाहरणार्थ जर तुमचे मूल पिझ्झाची मागणी करत असेल, तर तो बाहेरून मागवण्याऐवजी घरी बनवून द्या. पिझ्झामध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ आणि हिरव्या भाज्या वापरून तुम्ही हेल्दी बनवू शकता. कोणतेही मूल त्याच्या आवडत्या डिश खाण्यास नकार देणार नाही.
लहान प्लेट
अनेकदा असे दिसून येते की पालक आपल्या मुलाला जास्त खाऊ घालतात. त्यामुळे मुले लठ्ठ होऊ लागतात. मुलाच्या वयानुसार आहाराचे प्रमाण नेहमी ठरवावे. यासाठी नेहमी लहान ताटात मुलाला खायला द्यावे. भूक लागल्यास पुन्हा देऊ शकता.
हेही वाचा >> फ्रिजमध्ये ठेऊनही भाज्या खराब कशा होतात? ‘या’ पद्धतीनं ठेवून बघा, भाज्या राहतील अधिककाळ फ्रेश आणि टवटवीत
क्रिएटिव्हिटी वापरा
ताटात दररोज पोळी पाहून तुमच्या मुलाला कंटाळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत पोळी ऐवजी तुम्ही मुलांच्या ताटात हार्ट, स्माइली, स्टार अशा वेगवेगळ्या आकाराचे पराठे देऊ शकता.