Plastic Wrap Parenting : मुलांचे योग्य संगोपन ही मोठी जबाबदारी आहे. मुलांबद्दल अति काळजी करणे योग्य मानले जात नाही. अति-संरक्षण करणारे पालक अनेकदा प्लास्टिक रॅप पॅरेंटिंग (Plastic wrap Parenting) करतात जे मुलांसाठी चांगले नाही. हे पुढे मुलांसाठी स्वावलंबी होण्यासाठी अडथळा ठरू शकते. प्लॅस्टिक रॅप पालकत्व म्हणजे काय आणि त्याचा मुलांवर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
प्लॅस्टिक रॅप पालकत्व म्हणजे काय?
मुलाच्या सुरक्षा आणि काळजी पोटी त्यांचे खूप जास्त संरक्षण करणे आणि मुलांना काहीही त्रास होऊ शकतो या विचाराने प्रत्येक गोष्टीपासून त्यांचे संरक्षण करणे हे प्लास्टिक रॅप पालकत्व आहे. यामध्ये एखाद्या मौल्यवान वस्तूला जसे प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवतो तसेच हे पालक आपल्या मुलांबरोबर वागतात.
हेही वाचा – महिला दिनानिमित्त फिरण्यासाठी खास ऑफर घेण्याआधी वाचा ही बातमी, नाहीतर नंतर होईल पश्चाताप
प्लॅस्टिक रॅप पालकत्वाची लक्षणे
असे पालक आपल्या मुलांना थोड्या थोड्या वेळाने भेटायला जातात. त्यांना एकटे खेळण्याची परवानगीही नसते. कोणतीही गोष्ट मुलांना करू देण्याऐवजी स असे पालक स्वत:च मुलांसाठी सर्वकाही करतात. पालकांच्या या सवयींमुळे मुलांमध्ये जीवन कौशल्ये विकसित होत नाहीत.
पालक कसे वागतात?
प्लॅस्टिक रॅप पॅरेंटिंग करणाऱ्या पालकांचे त्यांच्या मुलाच्या आहारापासून ते मित्र बनवण्यापर्यंतच्या आवडीनिवडींवर नियंत्रण असते. त्यांना आपले मूल गमावण्याची भीतीही असते. यामुळे मुलांन अनेक गोष्टींबाबात वास्तविक भावना अनुभवता येत नाहीत.
हेही वाचा – International Women Day 2024: तुमच्या आयुष्यातील महिलांसाठी आजचा दिवस कसा करू शकता खास? जाणून घ्या टिप्स
मुलावर कसा परिणाम होतो
प्लॅस्टिक रॅप पॅरेंटिंगमध्ये वाढलेली मुले स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत. पुढे आयुष्यात त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर निर्णय घेण्यात अडचणी येतात. ही मुले टीका स्वीकारण्यास सक्षम नाहीत. याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर देखील होतो. अशा मुलांकडे कोणतीही गोष्ट करण्याचाआत्मविश्वास नसतो.