नीति शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात मुलांच्या संगोपनावर लक्ष वेधलं गेलं आहे. पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या वाईट संस्कार होऊ नये यासाठी प्रयत्नशील असावं. पालकांनी यासाठी आपला वेळ सार्थकी लावावा, चांगले काम करावे. यासाठी सर्व लोकांनी आपले काम म्हणजेच कर्तव्य पार पाडले पाहिजे. जे पालक मुलांची काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. चाणक्य नीतीनुसार जाणून घेऊयात की मुलांची काळजी कोणत्या प्रकारे घेतली पाहिजे.
पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः।
नीतिज्ञाः शीलसम्पन्ना भवन्ति कुलपूजिताः।।
चाणक्य नीतिच्या दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्ञानी पुरुषांनी आपल्या मुला-मुलींमध्ये चांगले गुण वाढवले पाहिजेत. कारण नीति जाणणारा आणि चांगले गुण असणारी सभ्य स्वभावाची व्यक्तीच कुटुंबात पूजली जाते. चाणक्य म्हणतो की, लहानपणी ज्या पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जाईल, त्याच पद्धतीने त्यांचे जीवनही विकसित होईल, त्यामुळे त्यांना अशा मार्गावर मार्गदर्शन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांच्यात कौशल्याबरोबरच नम्रताही विकसित होईल. केवळ सदाचारी लोकच कुटुंबाची शोभा वाढवतात.
माता शत्रु पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा।।
अकराव्या श्लोकात लिहिले आहे की, ते पालक हेच मुलांचे भविष्यात शत्रू होतात. ज्या पालकांनी मुलांना शिक्षण दिले नाही, कारण अशिक्षित मुलाला विद्वानांच्या गटात बसता येत नाही, त्याला नेहमी तुच्छतेची वागणूक मिळते. . बगळा हंसांच्या कळपात असतो तसा विद्वानांच्या गटात त्याचा अपमान केला जातो. नुसता मनुष्य जन्म घेऊन बुद्धिमान होत नाही. त्याच्यासाठी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे. रूप, आकार आणि प्रकार सर्व मानवांचे सारखेच असतात, फरक त्यांच्या विद्वत्तेतूनच दिसून येतो. जसा पांढरा बगळा पांढऱ्या हंसांमध्ये बसून हंस बनू शकत नाही, त्याचप्रमाणे अशिक्षित माणूस सुशिक्षित लोकांमध्ये बसून शोभा वाढवू शकत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे, जेणेकरून समाजात त्याची प्रतिष्ठा वाढेल.
Chanakya Niti: ‘या’ गोष्टी नसतील तर तिथे वास्तव्य करू नये, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्।।
बाराव्या श्लोकात असे लिहिले आहे की, अति लाड केल्याने पुत्रांमध्ये अनेक दोष निर्माण होतात. तसेच वेळीच आवर घातल्याने आणि शिक्षा केल्याने त्यांना चुकीची जाणीव होते. म्हणून पुत्र आणि शिष्यांचे जास्त लाड करू नयेत, त्यांना शिक्षा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आई-वडिलांनी अतिप्रेम केल्याने मुलांच्या दोषांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांनी काही चुकीचे काम केले तर त्यांना अगोदरच समज देऊन त्या चुकीच्या कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलाने चूक केली असेल तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचे लाड करणे योग्य नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षाही झाली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य-अयोग्य समजेल.