Parents Child Relationship : आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी नेहमी काळजी असते. मुलांनी नेहमी आनंदी राहावे आणि मनातील सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर कराव्यात अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते, पण अनेकदा मुलं आई-वडिलांजवळ व्यक्त होत नाही आणि अनेक गोष्टी मनात ठेवतात; ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो.
पालकांनो जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलांनी तुमच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर कराव्यात आणि त्यांनी नेहमी आनंदी राहावं, तर या काही गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांना त्यांचा दिवस कसा गेला हे विचारा

दररोज रात्री कमीत कमी अर्धा तास मुलांबरोबर संवाद साधावा. त्यांचा दिवस कसा गेला, याविषयी विचारपूस करावी. मुलांबरोबर मैत्रीचे नाते निर्माण करावे, ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अडचणी, चांगल्या-वाईट गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकतात.

मुलांना रागवू नका

मुलांबरोबर तुम्ही जितके जास्त प्रेमाने वागता, तितके ते तुमच्याजवळ येतात; त्यामुळे मुलांना रागावणे टाळा. त्यांच्याबरोबर बोला आणि त्यांची बाजू समजून घ्या. त्यांचे चुकले असले तर त्यांना प्रेमाने समजून सांगा.

हेही वाचा : Cauliflower: फ्लॉवरमधील अळ्या काढा झटक्यात बाहेर, ही सोपी ट्रीक वापरून पाहा

मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकू नका

मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकू नका. एखाद्या विषयामध्ये कमी गुण मिळाले तर त्यांच्याबरोबर बोला. त्यांची अडचण समजून घ्या, पण परिक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून त्यांना ओरडू नका. त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी दबाव टाकू नका. या कारणामुळे अनेकदा मुलं वैतागू शकतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

मुलांचे कौतुक करा

जर तुम्ही एखादे चांगले काम केले आणि कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्हाला त्यातून प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे मुलांनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे तुम्ही कौतुक केले, तर त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents child relationship child never be unhappy and will share everything if parents should do these things for children ndj
Show comments