पालकांना मुलांच्या सुरक्षेची नेहमीच चिंता असते. आपले मूल सुरक्षित असावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पालकांचे मुलांवर इतके प्रेम असते की, मुले त्यांच्यापासून कधीही दूर जाऊ नये, असे त्यांना नेहमी वाटते.
जर काही गोष्टी पालकांनी मुलांना शिकवल्या, तर सार्वजनिक ठिकाणी मुले सुरक्षित राहतील. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
- पालकांनी मुलांना नेहमी सांगावे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीपासून कोणतीही वस्तू घेऊ नये. मुलांना पोलिस ठाणे किंवा सार्वजनिक दूरध्वनी केंद्र (पब्लिक टेलीफोन बूथ)विषयी माहिती सांगावी. जर कोणी अनोळखी व्यक्ती त्रास देत असेल, तर मुलांना जोरजोराने ओरडायला सांगावे.
हेही वाचा : श्रीकृष्णाकडून शिका ‘या’ पाच गोष्टी; जाणून घ्या आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र
- लहान मुले खूप खोडकर असतात. घरातून बाहेर पडल्यावर ती एका जागी उभी राहत नाहीत. त्यामुळे मुले हरवण्याची खूप जास्त भीती असते. म्हणून पालकांनी दर सहा महिन्यांनी मुलांचे फोटो काढावेत आणि मुलांच्या फिंगरप्रिंट्सचीसुद्धा नोंद करावी.
- पालकांनो, मुलांना सांगा की, तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहात आणि तुम्ही असताना त्यांच्याबरोबर काहीही वाईट होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही मुलांबरोबर घराच्या बाहेर पडता तेव्हा मुलांजवळ एखादा असा डिव्हाइस द्या की, ज्यामुळे ती लगेच तुमच्याशी संपर्क साधू शकतील.
हेही वाचा : फाटलेली किंवा जुनी बेडशीट फेकण्याची चूक तुम्हीही करता? या घरगुती जुगाडच्या मदतीने असा करा वापर
- सार्वजानिक ठिकाणी मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक ‘कोर्ड वर्ड’ बनवा. मुलांना हा ‘कोर्ड वर्ड’ लक्षात ठेवायला सांगा. मुलांना समजून सांगा की, जर कोणी तुमच्या अनुपस्थितीत घ्यायला आले असेल, तर त्यांना हा ‘कोर्ड वर्ड’ विचारा. जर समोरची व्यक्ती ‘कोर्ड वर्ड’ सांगू शकत नसेल, तर मुलांनी त्यांच्याबरोबर जाणे टाळावे.