Parenting Tips : मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी पालक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात.आपले मुलांचे व्यक्तिमत्त्व चांगले असावे, त्याला मानवी मुल्यांचे महत्त्व समजावे, यासाठी पालकांनी काही लघुपट त्यांच्या मुलांना दाखवायला पाहिजे. हे लघुपट कोणते? आज आपण जाणून घेऊ या.
maonduty या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तज्ज्ञांनी कोणते पाच लघुपट दाखवावे, याविषयी माहिती सांगितली आहे.
या व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे –
फॉर द बर्डस – या लघुपटातून मुलांना शिकायला मिळते की दिसणे महत्त्वाचे नाही. तुम्ही जसे आहात तसे छान आहात.
पाइपर – भीती वाटत असलेल्या गोष्टींना कसे सामोरे जायचे, हे या लघुपटात सांगितले आहे.
द स्नोमॅन – स्नोमॅन चित्रपटातून मैत्री विषयी बरेच काही सांगितले आहे. या लघुपटातून तुम्ही मैत्री कशी निभवावी, हे कळेल.
द व्रॉन्ग रॉक – या लघुपटातून समानता मुलांना कळते. समान वागणूकीचे महत्त्व यातून कळतात.
कॅटरपिल्लर शूज – या लघूपटातून स्वत:ला व्यक्त कसं करायचं, हे मुलांना कळतं
हेही वाचा : Heart Attack In Winter : हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रिय पालक, मुलांना मानवी मुल्य शिकवण्यासाठी हे पाच लघुपट नक्की दाखवा. हे लघुपट युट्यूब चॅनलवर असून मोठ्या स्क्रिनवर तुम्ही दाखवू शकता. हे लघुपट फक्त ३० मिनिटांचे आहे. तुम्ही मुलांबरोबर पाहून या लघुपटांचा आनंद घेऊ शकता.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “तुम्हाला हिन्दी लघुपट माहिती आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा महाभारत आणि रामायण दाखवा. यातून त्यांना जीवन कसं जगायचं ते कळेल. आणखी एका युजरने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवा.”