आयुर्वेदानुसार पारिजात किंवा हरसिंगार ही एक औषधी वनस्पती आहे. त्यांच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात. ही वनस्पती भारतात पवित्र मानली जाते. मान्यतेनुसार पारिजात वनस्पती देवराज इंद्राने स्वर्गात लावली होती. हरसिंगार हे पारिजातचे दुसरे नाव आहे. हरसिंगार फुले अतिशय सुवासिक असतात, लहान पाकळ्या आणि रंग पांढरा असतो. फुलांच्या मध्यभागी असलेला चमकदार केशरी रंग त्याचे सौंदर्य आणखी वाढवतो. हे फूल फक्त रात्रीच उमलते, म्हणूनच याला रात्री-फुलणारी चमेली असेही म्हणतात. तिला रात्रीची राणी असेही म्हणतात. या वनस्पतीची पाने, फुले आणि साल यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात. पारिजात या फुलाच्या आणि त्याच्या पानाच्या मदतीने सायटिका आणि सांधेदुखीचा त्रास बरा होऊ शकतो. याशिवाय याच्या पानांमध्ये पोटातील जंत मारण्याची क्षमता असते. तसेच त्याची पाने सर्दी-खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहेत.
एचटी न्यूजनुसार, पारिजातमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांशी लढण्यात मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया पारिजातने काय उपचार करता येतील.
पारिजाताचे जाणून घ्या फायदे
सायटिकाच्या वेदनांपासून मुक्ततता
पारिजाताची पाने बारीक करून गरम पाण्यात उकळवा. त्यानंतर हे पाणी तुम्ही एका भांड्यात गाळून घेऊन दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी याचे सेवन करा. याचे सेवन केल्याने सायटीकाचा त्रास दूर होतो.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
पारिजाताची पाने बारीक करून त्यात मध मिसळून खा. तुम्हाला हवे असल्यास पारिजाताची पाने बारीक करून गाळून त्यात मध मिसळून त्याचा रस बनवा. दिवसातून दोनदा याचे सेवन करा. याने कोरडा खोकला पुर्णपणे बरा होईल. सर्दी आणि खोकल्यासाठी, तुम्ही चहासारखे बनवून ते पिऊ शकता. पारिजातची पाने पाण्यासोबत उकळावा. त्यात तुळशीची काही पानेही टाका. हे तयार झालेला काढा तुम्ही रोज प्या, याने सर्दी-खोकला दूर होईल.
संधिवात वेदनांपासून आराम
पारिजातची पाने, साल आणि फुले एकत्र घ्या. या घटकांच्या ५ ग्रॅममध्ये २०० ग्रॅम पाणी मिसळा. त्याचा काढा बनवण्यासाठी यातील दोन तृतीयांश पाणी कोरडे होईपर्यंत ते गॅसवर मंद आचेवर ठेवा. फक्त यातील पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहिले पाहिजे. आता हा काढा तयार झाला. यानंतर तुम्ही या काढयाचे नियमित सेवन करा.
सूज आणि वेदना आराम
पारिजातची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा. या काढयाचे तुम्ही नियमित दोनदा सेवन करा. यामुळे शरीराला मारणारी सूज पुर्णपणे कमी होईल आणि त्यामुळे होणारा त्रासही दूर होईल.
पारिजातच्या पानांमुळे पोटातील जंत दूर होतात
पोटातील कोणत्याही प्रकारचे जंत मारण्यासाठी पारिजातची पाने खूप गुणकारी आहेत. यासाठी ताजी पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि त्यात साखर मिसळून प्या. यामुळे पोटात आणि आतड्यांमध्ये राहणारे हानिकारक जंत नष्ट होतात.
पारिजात वनस्पती जखमा भरून काढते
पारिजातमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या जखमा बरे करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पारिजात बियांची पेस्ट बनवून ती फोडांवर किंवा इतर सामान्य जखमांवर लावा. यामुळे जखम भरून निघते.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा आणि क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)