Best Yoga : अनेकदा आपण दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष देत नाही. नीट आहार, नियमित व्यायाम करत नाही. याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. नियमित योगा करणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. जे लोक दिवसभर ८-९ तास बसून काम करतात, त्यांनी काही योगासने आवर्जून करावेत. योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पर्वतासन, भुजंगासन आणि बालासन यांचा योगा फ्लो करण्याचा सल्ला दिला आहे. योगा फ्लो म्हणजे ही तिन्ही आसन मिळून करायचे. या योगा फ्लो चे फायदे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योग अभ्यासक मृणालिनी या व्हिडीओमध्ये पर्वतासन, भुजंगासन आणि बालासन हे एकाच फ्लोमध्ये करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहितात, “रोज २-३ मिनिटे हा योगाफ्लो केल्यास ताणतणाव, चिंता कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. पोटातील अवयवांना मसाज मिळून पचनशक्ती सुधारते. पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते.सायटिकाच्या दुखण्यावर आराम मिळण्यास मदत होते. श्वासोच्छ्वास सुधारण्यास मदत मिळते.” व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मृणालिनी या पर्वतासन, भुजंगासन आणि बालासन करताना दिसत आहे.

yogamarathi_ या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन योग अभ्यासक मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रोज या योगा फ्लोचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.
हे करताना तुम्हाला पोटाच्या भागाला मालिश केल्यासारखा फिल येईल त्यामुळे ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात, मासिक पाळीच्या समस्या दूर होतात व पचनक्रिया सुधारते.
तुमचे खांदे, पाठीचा कणा आणि पाय चांगले ताणले जाऊन त्यांची लवचिकता सुधारते व ते मजबूत होतात.
अगदी सावकाश श्वासांसोबत शरीराची हालचाल करा.
सुरुवातीला 3 वेळा करून हळू हळू संख्या वाढवा.” त्या पुढे कॅप्शनमध्ये लिहितात, “अतिसार, खांद्यांचे दुखणे, मानदुखीचा त्रास, हृदयरोग असल्यास हा योगाफ्लो करणे टाळा.”

हेही वाचा : Birth Control Pill and Sex Drive : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे लैंगिक इच्छा कमी होते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…. 

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “योगा करण्याची योग्य वेळ काय असते?” तर एका युजरने लिहिलेय, “खूप महत्त्वपूर्ण माहिती देतात. धन्यवाद” आणखी एका युजरने विचारलेय, “हा योगा आपण पिरेड्सच्या दिवसांमध्ये करू शकतो का?

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parvatasana bhujangasana and balasana yoga flow help to become healthy who work for 8 to 9 hours best yogasan for healthy lifestyle ndj