हसण्यामुळे आपल्या चेहऱ्याचे स्नायू शिथील होतात. हसणे हाच सगळ्यावर रामबाण उपाय आहे त्यामुळे हास्योपचार वगैरे बाबीही उदयास आल्या आहेत, पण प्रत्येकवेळी अवाजवी हसणे हे फायद्याचे नसते. सगळ्या गोष्टींवर ते औषध नाही व उलट त्यामुळे काही रुग्णांना काही वेळा हानी होऊ शकते असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. असे असले तरी हास्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत, अति सर्वत्र वर्जयेत हा नियम पाळला तर मर्यादा सांभाळून अगदी खळखळून हसायलाही हरकत नाही. नेहमी नैसर्गिक हास्य हे कृत्रिम हास्यापेक्षा जास्त फायद्याचे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
ब्रिटनमधील बर्मिगहॅम व ऑक्सफर्ड या विद्यापीठातील संशोधकांनी १९४६ ते २०१३ या काळातील माहितीचा वापर करून हा निष्कर्ष काढला आहे.
नैसर्गिक हास्याचे फायदे
नैसर्गिक हास्याने रोज २००० उष्मांक (कॅलरी) दळतात व मधुमेहींच्या रक्तातील साखर कमी होते. हसण्याने वंध्यत्वही कमी होते. ज्या मातांना मूल होत नाही अशा ३६ टक्के स्त्रियांना विदूषकांचे हास्य दाखवले असतात त्यांना आयव्हीएफ व इतर तंत्रांनी मूल होण्याची शक्यता वीस टक्क्य़ांनी वाढते.
विनोदाच्या बाबतीतही वेगळेच संशोधन पुढे आले आहे. जेव्हा एखादा रुग्ण मानसिकदृष्टाय खटलेला असतो तेव्हा त्याला दु:खाकडे झुकणारे विनोद सांगितल्यास माणूस अधिकच आजारी पडू शकतो, असे आढळून आले आहे. शुष्क विनोदांनी निर्जलीकरण होते व अभिरुचीहीन विनोदांनी आपली अभिरुची हीन बनू शकते ज्याला रसनादोष असे म्हटले जाते.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
मनमोकळे हास्य हितकारक..
संशोधकांनी म्हटले आहे की, हास्यामुळे काहीवेळा फायदा होतो काही वेळा नुकसान होते. विशिष्ट हेतूविरहित असलेले नैसर्गिक हसू हे हानीकारक नसते. जे विदूषक रुग्णालयात जाऊन त्यांच्या हास्याद्वारे इतरांचा ताण कमी करू पाहतात त्याचा किरकोळ शस्त्रक्रिया झालेल्या (टाके घातलेल्या) मुलांवर वाईट परिणाम होतो. हास्याचे जे फायदे आहेत त्यात ताण नाहीसा करणे हे एक आहे कारण हास्यामुळे रक्तवाहिन्यांचा कठीणपणा कमी होत असतो परिणामी ह्रदयविकाराचा झटका येण्याचे टळते. विदूषकांमुळे सीओपीडीच्या रुग्णात त्यामुळे फायदा होतो.
हास्याचे दुष्परिणाम
काही स्त्रियांचा भरपूर हसण्याने रेसिंग हार्ट सिंड्रोम या लक्षणांनी मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हृदयाची एखादी रक्तवाहिनी फुटू शकते. हसताना हवा मोठय़ा प्रमाणात आत घेतली जाते ज्यामुळे, अस्थम्याचा आजार बळावतो. अतिहसण्याने अंतर्गळ (हार्निया) होऊ शकतो. काही वेळा अपस्मारही होऊ शकतो.
हसा.. पण, जरा जपून!
हसण्यामुळे आपल्या चेहऱ्याचे स्नायू शिथील होतात. हसणे हाच सगळ्यावर रामबाण उपाय आहे त्यामुळे हास्योपचार वगैरे बाबीही उदयास आल्या आहेत,
आणखी वाचा
First published on: 14-12-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient be careful of smiling