भारताचे आघाडीचे डिजिटल आर्थिक सेवा प्रदाता व्यासपीठ पेटीएमने नुकतीच एलपीजी सिलेंडर बुकिंगवर आकर्षक कॅशबॅक व इतर रिवॉर्डसची घोषणा केली. नवीन युजर्स ‘३ पे २७००’ कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतील. या ऑफरमध्ये युजर्सला सलग ३ महिन्यांच्या पहिल्या बुकिंगकरिता जवळपास ९०० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. आधीपासूनच्या युजर्सना प्रत्येक बुकिंगवर खात्रीदायी रिवॉर्ड व जवळपास ५००० कॅशबॅक पॉइण्ट्स मिळतील. हे पॉइण्ट्स चांगल्या ब्रॅण्ड्सच्या वस्तू विकत करण्यासाठी घेता येईल. ही ‘३ पे २७००’ कॅशबॅक ऑफर इंडेन, एचपी गॅस व भारत गॅस या तिन्ही प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. ग्राहकांसाठी पेटीएम पोस्टपेड म्हणून ओळखल्या जाणा-या पेटीएम नाऊ पे लेटर प्रोग्रॅममध्ये नोंदणी करत बुक केलेल्या सिलेंडरसाठी रक्कम पुढील महिन्यामध्ये भरण्याचा पर्याय देखील असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा