पेटीयम, फोन पे, गुगल पे असे एक ना अनेक पर्याय आता आपल्याला बिल भरण्यासाठी उपलब्ध आहेत. काही मिनिटांतच आपण खरेदी केलेली वस्तू किंवा अन्य गोष्टींसाठी पैसे भरू शकतो. या डिजिटल पेमेंटच्या विश्वात खात्रीलायक अॅप्सचाच वापर करणे गरजेचे आहे. भारताचे आघाडीचे डिजिटल आर्थिक सेवा व्‍यासपीठ पेटीएमने आज देशभरातील व्‍यापा-यांना विनाशुल्‍क पेटीएम साऊंडबॉक्‍स देण्‍याची घोषणा केली आहे. कंपनीचे पेटीएम स्‍पीकर म्‍हणून ओळखले जाणारे डिवाईस पेटीएम फॉर बिझनेस (P4B) अॅपचा उपयोग करून खरेदी केल्‍यास त्‍यावर २९९ रूपयांसाठी ४० टक्‍क्‍यांची सूट देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटी डिवाईसची कींमत शून्य

एका महिन्‍यामध्‍ये ५० व्‍यवहारांची नोंदणी करणारे व्‍यापारी किंवा व्‍यवसाय मालकांना पाच महिन्‍यांसाठी दर महिन्‍याला ६० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल, ज्‍यामुळे डिवाईसची किंमत जवळपास शून्‍य होईल.

व्यापार करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्‍यास मदत

कंपनीचा विश्‍वास आहे की, ही ऑफर देशभरातील लहान दुकानदारांना डिजिटल व्‍यवहारांचा अवलंब करत ऑनलाइन व्‍यवहार स्‍वीकारण्‍यामध्‍ये आणि करण्‍यामध्‍ये मदत करेल. ही ऑफर देशभरातील व्‍यापा-यांसाठी उपलब्‍ध आहे. कंपनीला व्‍यापा-यांमध्‍ये पेटीएम साऊंडबॉक्‍सचा अवलंब वाढताना दिसत आहे. हे साऊंडबॉक्‍स सुलभपणे डिजिटल पेमेण्‍ट्स स्‍वीकारते आणि व्‍यापा-यांना सर्व व्‍यवहारांवर देखरेख ठेवण्‍यास मदत करते. ज्‍यामुळे ग्राहकांनी दाखवलेले खोटे स्क्रिन्‍स व चुकीचे कन्फर्मेशन पासून संरक्षण होते. विविध भाषांमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे डिवाईस त्‍यांना त्‍यांच्‍या मातृभाषेमध्‍ये व्‍यवहार करण्याची आणि माहिती देण्‍यासाठी मदत करते.

डिजिटल पेमेण्‍ट्सबाबत विश्‍वास निर्माण करण्‍यासाठी

पेटीएम प्रवक्‍ते म्‍हणातात की ”पेटीएम साऊंडबॉक्‍स हे देशभरातील व्‍यापा-यांना डिजिटल पेमेण्‍ट्स साधनांसह सक्षम करणा-या आमच्‍या सर्वात यशस्‍वी डिवाईसेसपैकी एक आहे. या डिवाईसने युजर्समध्‍ये डिजिटल पेमेण्‍ट्सबाबत विश्‍वास निर्माण करण्‍यासाठी मदत होईल असे आम्हाला वाटते. आम्‍ही आशा करतो की, या ऑफरच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक व्‍यापारी या सेवांचा अवलंब करतील.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm offers its soundbox to merchants for free offers attractive benefits on making more transactions ttg