Pear For Gut Health: आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे हे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेक जण सजग आहेत. या पार्श्वभूमीवर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय जेवावे हे माहीत असणेही गरजेचे आहे. आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते; पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि स्वत:हून आरोग्याच्या समस्या अंगावर ओढवून घेतो. तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही खाऊ शकता अशा सर्वात पौष्टिक फळांपैकी एक म्हणजे पेर फळ. पेर फळाला बोली भाषेमध्ये नाशपाती या नावानंही ओळखले जाते. जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक आणि स्वादिष्ट जोड शोधत असाल, तर पेर हे फळ आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फायबरचा उत्तम स्त्रोत

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पेर फळाला का समाविष्ट करावे याचं एक मुख्य कारण म्हणजे, पेर या फळामध्ये फायबर असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते. यूएस कृषी विभागाच्या मते, एका मोठ्या पेर फळामध्ये (२३० ग्रॅम) ७.१३ ग्रॅम फायबर असते. हे फायबर मल मऊ करण्यास मदत करते आणि नियमित मलविसर्जनास प्रोत्साहन देते.

तुम्हाला हायड्रेटेड ठेवते

पेर हे सर्वात जास्त पाणी असलेल्या फळांपैकी एक आहे? होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. USDA नुसार, पेरमध्ये ८४% पाणी असते, जे हायड्रेटेड राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी प्याल तेव्हा ते पचन सुरळीत करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते, म्हणून पेर खाल्ल्याने तुम्ही केवळ हायड्रेट होत नाही तर तुम्हाला संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वेदेखील मिळतात.

पेर हे फळ सहज पचण्याजोगे आहे, जे ॲसिड रिफ्लेक्स किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी ते योग्य ठरते. पेर फळ तुमच्या आतड्याला त्रास न देता शांत करण्यास मदत करू शकतात. पेर फळाचे सेवन केल्याने जळजळ कमी करण्यासोबतच टाइप २ मधुमेह आणि स्ट्रोकसह प्रमुख आरोग्य समस्यांचा धोकाही कमी करू शकतात. शिवाय फायबर, हायड्रेशन, प्रीबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे सेवन पेर या फळाला अष्टपैलू बनवते, त्यामुळे या फळाचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा आणि तुमची पचनसंस्था अधिक निरोगी करा.

हेही वाचा >> झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं; नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा पाहा

आतडे स्वच्छ करणे खरोखर शक्य आहे का?

आपले आतडे प्रभावीपणे स्वच्छ करणे खरोखर शक्य आहे; परंतु ते एक दिवसाचे काम नाही. त्यासाठी आपण रोज आतड्याची काळजी घेणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीमध्ये अतिरिक्त कॅलरीज कमी करण्यासाठी नियमित व्यायामाचाही समावेश करणे आवश्यक आहे. साखर आणि साखरयुक्त पेये टाळल्याने ऊर्जेची पातळी उच्च राहून, एकंदर आरोग्य चांगले राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pear for gut health 5 reasons why you should include nashpati in your daily diet srk