pedicure tips: हल्ली महिला त्यांच्या तळहाताच्या त्वचेपासून ते तळपायाच्या त्वचेपर्यंत अगदी नीट स्वत:ला जपतात. त्यासाठी पार्लरमध्ये भरपूर पैसेही खर्च करतात. मात्र मध्यवर्गीय महिलांना आता पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त उपाय घेऊन आलो आहोत. ज्याने तुम्हाला घरीच पेडिक्युअर करता येईल तेही फक्त दहा रुपयांत.  या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

पेडीक्योर करण्याचे फायदे

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

पेडीक्योरमुळे पायांचे सौंदर्य वाढते. पायावर जमा झालेली मृत त्वचा काढून निघून जाते आणि फाटलेल्या टाचांना दुरुस्त होतात. नियमित पेडीक्योर केल्याने पाय चमकू लागतात. याशिवाय नखांची चमकही वाढते. पेडीक्योर करताना पायांना मसाज केले जाते, त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्याचबरोबर स्क्रब केल्याने रक्ताभिसरणही चांगले राहते.

घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक खोलगट बादली
  • शाम्पू
  • सैंधव मीठ
  • नेलपेंट रिमूव्हर
  • नेल कटर
  • लिंबू
  • प्युमिक स्टोन
  • गुलाबाच्या पाकळ्या
  • फूट स्क्रब
  • ऑलिव्ह ऑइल/ कोकोनट ऑइल/ बदाम ऑइल
  • क्युटिकल क्रिम

पेडिक्युअर कसं कराल

  • यासाठी सर्वात आधी नखांवर आधी नेलपेंट लावलेलं असेल तर ते रिमूव्हरच्या मदतीने काढून घ्या. नेल कटाच्या मदतीने सर्व नख व्यवस्थित हव्या त्या लेन्थवर कट करून घ्या. नेल फायलरने छान शेप द्या आणि नखांची टोकं शार्प करून घ्या. नखांमध्ये काही घाण असेल तर काढून घ्या.
  • आता दुसरीकडे , गरम पाण्याने भरलेली बादली किंवा टब घ्या. पाणी तुम्चाला सहन होईल तास अधिक किंवा जास्त गरम घेऊ शकता. त्यात लिंबाचा रस पिळा , गुलाबाच्या पाकळ्या, सैंधव मीठ, शाम्पूचे काही थेम्ब घाला आणि एकत्र करा. या बादलीत तुमचे दोन्ही पाय बुडवा. अगदी २०-२५ मिनिट तसेच राहूद्या. त्यानंतर नेल ब्रशच्या साहाय्याने पाय आणि नख स्वच्छ करा.
  • यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या. नखांवर क्युटिकल क्रीम लावून घ्या. तुमच्याकडे क्युटिकल क्रीम नसेल तर ऑलिव्ह ऑईलसुद्धा वापरू शकता. जिथे पायाची त्वचा जास्त कडक झालीये असं वाटत असेल तिथे प्युमिक स्टोनने घासा.असं केल्यास डेड स्किन निघून जाईल.

हेही वाचा – Mental Health Special: स्क्रीनसमोर जेवणाऱ्या मुलांना ‘भवताल भान’ कसं येणार?

  • आता नखांना लावलेलं क्रीम किंवा ऑइल पुसून घ्या. डेड स्किन म्हणजेच क्युटिकल्स जी नखांना चिकटलेली असते ती क्युटिकल च्या मदतीने काढून घ्या. आता चांगलं स्क्रब घ्या आणि त्याने पाय छान स्क्रब करून घ्या.