फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे आपण नेहमी ऐकतो. ऋतूनुसार त्या ऋतूतील फळे आवर्जून खायला हवीत. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. मात्र, लहान मुले किंवा अगदी मोठी माणसेही फळे खाण्याचा कंटाळा करताना दिसतात. सफरचंद हे फळ आरोग्याला अतिशय उपयुक्त असे फळ आहे असे म्हटले जाते. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना आवर्जून सफरचंद खाण्यास सांगितले जाते. पण अनेकांना सफरचंद साले काढून खायची सवय असते. मात्र, सफरचंदाची साले आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. पाहूयात सफरचंदाच्या सालांचे उपयोग.
१. सफरचांदाची साले रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
२. सफरचंदाच्या सालांमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते.
आणखी वाचा
३. मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालांसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.
४. सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त असते. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते.
५. सफरचंद हे दातांना किडण्यापासून बचाव करते. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्यामुळे सफरचंदाचा आहारातील समावेश तोही सालांसकट अतिशय महत्त्वाचा असतो.
First published on: 11-10-2017 at 17:36 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peel of apple is useful for health keep it in your diet