लोक सकाळपेक्षा दुपारी अधीक अप्रामाणिक असतात असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
एखाद्या व्यक्तिला फसवण्यामध्ये व एखाद्याशी खोटेबोलण्यावरील आपला ताबा दिवस जसजसा सरत जातो तसतसा कमी होत जातो व आपण खोटे बोलत जातो. असा दावा या अभ्यासावर कामकरणाऱ्या संशोधकांनी केला आले आहे.
“नितीशास्त्राचे अभ्यासक म्हणून आम्ही लोकांच्या खोटे बोलणे, चोरी करणे आणि फसवणूक करणे यांसारख्या अनैतिक वागण्याचे परिक्षण केले,” असे हार्वाड विद्यापीठाचे संशोधक मरियम कौचाकी आणि उथास डेविड इकलेस, स्कूल ऑफ बिझनेसचे इसाक स्मिथ यांनी सांगितले.  
“सकाळी केलेल्या प्रयोगांमध्ये दिसलेल्या प्रामाणिकपणाचे संध्याकाळपर्यंत अनैतिक वागण्यामध्ये रूपांतर झाल्याचे आमच्या निदर्शनामध्ये आले,” असे हे संशोधक म्हणाले.
दैनंदीन कामाच्या तणावामुळे व आराम कमी भेटल्यामुळे सकाळी चांगले वागणारे लोक भरकटतात व दुपारनंतर खोटे बोलण्यास सुरूवात करत असल्याचा दाव या संशोधकांनी केला.
दोन प्रयोगांमध्ये महाविद्यालयीन वयाच्या सहभागींना संगणक पटलावर डॉटस दाखलवण्यात आले. त्यांना संगणक पटलाच्या डाव्या व उजव्या बाजूला किती डॉटस् आहेत ते पडताळण्यास सांगितले. सहभाग घेतलेल्या तरूणांनी दिलेल्या बरोबर उत्तरांना त्यांना पैसे दिले नाही. मात्र, ज्यांना दहापट अधिक रक्कम देण्यात आली त्यांनी संगणक पटलाच्या डाव्या बाजूला अधीक डॉटस् असून देखील उत्तरांमध्ये कमी नोंदवले. ही सरळ फसवणूक होती.
संशोधनामधील गृहीतकांनुसार सकाळी ८:०० वाजता आणि दुपारी १२:०० वाजता ज्या प्रणाणात फसवणूककरण्यात आली त्या पेक्षी दुपारी १२:०० ते संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत फसवण्याचे प्रमाण अधीक आढळून आल्याचे संशोधकांनी सांगितले. संशोधकांनी या संशोधनाला ‘मॉर्निंग मोरॅलिटी इफेक्ट’ म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा