कोकाकोला व पेप्सीको या दोन्ही कंपन्या त्यांच्या शीतपेयातील हानिकारक घटक काढून टाकणार आहेत, त्यात माउंटन डय़ू, फँटा व पॉवरेड या पेयांचा समावेश आहे. यातील ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑईल हे हानिकारक असल्याचे मिसीसीपी येथील एका किशोरवयीन मुलीने चेंज डॉट ओआरजी या संकेतस्थळावरील याचिकेत म्हटले होते व ते काढून टाकण्याची मागणी केली होती. पेप्सीकोच्या गटोरेड व कोकाकोलाच्या पॉवरेड या शीतपेयात ते असते. सारा कावनाघ या किशोरवयीन मुलीने याचिकेत असे म्हटले होते की, या घटकाचे पेटंट वेगळ्या कारणासाठी घेण्यात आले असून जपान व युरोपीय समुदायाची त्याच्या वापरावर बंदी आहे. कोकाकोला व पेप्सीको यांनी हा घटक सुरक्षित असल्याचा दावा केला, फळांच्या चवीच्या पेयांमध्ये तो वापरला जातो परंतु नंतर ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन ते बाटलीवरील लेबलात घटक काय लिहिले आहेत हे वाचू लागले व हानिकारक पदार्थ घ्यायचे नाहीत असे त्यांनी ठरवले त्यामुळे दोन्ही कंपन्यांना ग्राहकाच्या जागरुकतेपुढे मान तुकवावी लागली व त्यांनी तो घटक काढून टाकला.
  अमेरिकेत सध्या अशा ग्राहकांच्या आग्रहामुळे अनेक कंपन्यांनी  त्यांच्या अन्नपदार्थाचे घटक बदलले आहेत. अनेक खाद्यपदार्थामध्ये घातक रंग व रसायने वापरलेली असतात. नियामक गरजांचे आम्ही उल्लंघन करीत नाही असा अन्न कंपन्यांचा दावा आहे पण ते जेव्हा आमचे उत्पादन नसíगक असल्याचा जो दावा करतात तो खरा नसतो कारण अन्नपदार्थात अनेक कृत्रिम घटक वापरलेले असतात. पेप्सीकोने गेल्या वर्षीच ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑईल (बीव्हीओ) हा पदार्थ गॅटोरेडमधून काढण्याचे मान्य केले होते. आज सोमवारी कंपनीने इतर उत्पादनातूनही ते काढण्याची घोषणा केली. पेप्सीको कंपनी माउंटन डय़ू व अम्प एनर्जी िड्रक्समध्ये बीव्हीओचा वापर करते. न्यूयॉर्कमधील परचेस येथे असलेल्या या कंपनीने हा पदार्थ काढून टाकण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे.
    सोमवारी कोकाकोलाने असे सांगितले की, आम्ही सर्व उत्पादनातून हा घटक जगभरात जिथे ती वापरली जातात तिथे  काढून टाकणार आहोत. कोकाकोलाच्या पॉवरेडमध्ये बीव्हीओचा वापर केला जातो त्याचबरोबर फँटा, फ्रेस्का व इतर अनेक फळांच्या चवीच्या पेयात त्याचा वापर होतो. वर्षअखेरीपर्यंत बीव्हीओचा वापर आम्ही अमेरिकेत बंद करू असे कोकाकोलाने म्हटले आहे. त्याऐवजी सुक्रोज असिटेट आयसोब्युटायरेटचा वापर केला जाईल ते गेली १४ वष्रे पेयांमध्ये वापरले जात आहे. त्याचबरोबर ग्लिसेरल इस्टर हा च्युइंग गम व पेयात वापरला जाणारा पदार्थ वापरला जाईल असे कोकाकोलाने म्हटले आहे.  कोकाकोलाचे प्रवक्ते जॉश गोल्ड यांनी सांगितले की, बीव्हीओ अनेक देशात वापरले जाते पण कॅनडा व लॅटिन अमेरिकेत ते बंद करण्यात येत आहे. द सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटरेस्ट या हक्क गटाने म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाने १९७० पासून बीव्हीओच्या वापराला हंगामी तत्त्वावर वापरास परवानगी दिली होती व अजूनही ते हंगामी वापराच्याच यादीत आहे.
 कावनाग ही मिसीसीपीची किशोरवयीन मुलगी आता चेंज डॉट ओआरजी संकेतस्थळावर आणखी मोहीम राबवणार असून पेप्सीकोने त्यांच्या सर्वच पेयातून बीव्हीओ काढावे अशी मागणी करणार आहे. मोठय़ा कंपन्या ग्राहकांचे थोडय़ा प्रमाणात तरी ऐकतात हे यातून सिद्ध झाले आहे हे पाहून बरे वाटले अशी प्रतिक्रिया तिने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा