How To Seat While Eating: भारतीय परंपरा या समृद्ध व सर्वव्यापी म्हणून ओळखल्या जातात. धार्मिक किंवा आध्यत्मिकच नव्हे तर संस्कृती ही अनेकदा शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुद्धा प्रदान करते. अशीच एक संस्कृती म्हणजे पायाची मांडी घालून जेवायला बसने. तुम्हाला माहित आहे का, भारताव्यतिरिक्त, अनेक पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये सुद्धा मांडी घालून जमिनीवर बसून जेवणाची पद्धत आहे. विशेष म्हणजे अनेक आरोग्य तज्ज्ञांनी सुद्धा यासाठी शिफारस केली आहे. पण नेमकं खाली बसून जेवल्याने शरीराला काय फायदे होतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया…

खाली बसून जेवल्याने होणारे फायदे:

१) वजन कमी करण्यास मदत होते: जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो याचे सर्वात सोपे लॉजिक म्हणजे समजा तुम्ही खाली बसला आहात आणि जेवत आहात, तुम्हाला एखादी अधिकची पोळी, चमचाभर भात अजून हवा आहे. तुम्ही जागेवरून उठता किचनमध्ये जाता आणि परत येऊ बसता या साध्या हालचालीने सुद्धा तुम्हाला जेवताना रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे मानसिक रित्या असा फायदा होतो की, तुम्हाला विनाकारण भूक नसतानाही अधिक खायची इच्छा होत नाही.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Namibia animal killing marathi news
लोक खारींपासून हत्तींपर्यंत वाट्टेल ते का खातात?
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
Supreme Court, sub classification, reservation, caste based, Scheduled Castes, Scheduled Tribes, creamy layer, Buddhist community, Ambedkarist, economic criteria,
उपवर्गीकरणाची गोमटी मधुर फळे ‘एससीं’ना मनमुराद चाखू द्या!
Pakistan s balochistan terror attacks
अन्वयार्थ: रक्तलांछित बलुचिस्तान
‘या’ वेळात शेंगदाणे खाल्ल्यास झपाट्याने होणार वजन कमी? सेवनाची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…

२) पाठीचे दुखणे कमी होण्यासाठी मदत: जमिनीवर मांडी घालून बसणे ही साधी कृती योग आसन करण्यासारखे आहे. ही स्थिती पाठीचा कणा सरळ ठेवून पोश्चर सुधारण्यास मदत करते. यामुळे शरीराला लवचिकता येऊ शकते आणि शरीराच्या खालच्या भागातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

३) पचन सुधारते: मांडी घालून बसणे हे पचनास मदत करते आणि पाचक रसांचा प्रवाह वाढवते जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. हे पोटाच्या स्नायूंना सक्रिय करते जे पोटातील आम्ल कमी करण्यास मदत होते.

हे ही वाचा<< पांढरे मीठ व सैंधव मीठ यात नेमका फरक काय? यातील कोणते मीठ रोज किती प्रमाणात खावे, जाणून घ्या

४) मनाला आराम देते: ही स्थिती ध्यानासाठी आदर्श आहे आणि मन शांत ठेवून तणाव कमी करण्यास मदत करते.

५) कौटुंबिक संबंध सुधारण्यास मदत करते: पारंपारिकपणे भारतीय जेवणासाठी कुटुंब एकत्र बसते. यावेळी एकमेकांचा दिवस कसा गेला हे साधं संभाषणही तुमचे नातेसंबंध, बॉन्डिंग वाढवून आनंद वृद्धिंगत करू शकते