खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने जाहीर केलंय की ते आता किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकांना कस्टम ड्युटीचे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा देणार आहेत. बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की कॉर्पोरेट ग्राहक बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे सीमाशुल्क भरू शकतात, तर किरकोळ ग्राहक बँकेच्या रिटेल इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे ते भरण्यास सक्षम असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेच्या म्हणण्यानुसार, ही सुविधा सुरू केल्यावर ग्राहक कस्टम इलेक्ट्रॉनिक गेटवे ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रविष्ट केलेल्या बँकांच्या यादीतून ICICI बँक निवडून ऑनलाइन शुल्क भरू शकतात. ICICI बँकेचे ट्रान्झॅक्शन बँकिंग प्रमुख हितेश सेठिया यांनी भारतीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे की, “या सुविधेमुळे बँकेच्या लाखो ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक गेटवे कस्टम्सच्या वेबसाइटद्वारे कस्टम ड्युटीचं पेमेंट डिजिटल पद्धतीने करणं सोपं होणार आहे.”

आणखी वाचा : हिवाळ्यात रुम हीटर वापरणाऱ्यांनी काळजी घ्या, पश्चाताप होईल, जाणून घ्या काय आहे कारण ?

दरम्यान, HDFC बँकेचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) ICEGATE प्लॅटफॉर्मसह एकीकरण पूर्ण झाले आहे आणि ग्राहक आता त्यांचे सीमाशुल्क थेट बँकेमार्फत भरू शकतात. शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकांना थेट एचडीएफसी बँकेची निवड करून सीमाशुल्क भरण्याची परवानगी देईल.

आणखी वाचा : Travel Tips: तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच प्रवास करताय? मग चुकूनही या चार चुका करू नका

एचडीएफसी बँकेने सांगितले की, ते सीमा शुल्काचे किरकोळ आणि घाऊक दोन्ही पद्धतीचे पेमेंट देत आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांना यापुढे इतर बँक खात्यांद्वारे पेमेंट करण्याची आवश्यकता नाही, असे एका निवेदनात म्हटले आहे. HDFC बँकेच्या ग्रुप स्टार्टअप बँकिंग, सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय, भागीदारी आणि सर्वसमावेशक बँकिंगच्या प्रमुख स्मिता भगत म्हणाल्या, “कस्टम ड्युटीच्या डिजिटल पेमेंटमुळे भारतात व्यवसाय करणे सोपे होईल”.

सरकारी सुवर्ण रोख्यांच्या नवीन मालिकेसाठी निर्गमित किंमत: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2021-22 च्या सरकारी सुवर्ण रोख्यांच्या योजनेच्या नवीन मालिकेसाठी ४,७८६ रुपये प्रति ग्रॅम निर्गम मुल्य निश्चित केलं आहे. आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोल्ड बाँड योजना २०२१-२२ मधली मालिका ९ सोमवारपासून सुरू होईल आणि १४ जानेवारीपर्यंत खरेदी करता येईल. या बाँडची ४,७८६ इतके निर्गम मुल्य प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personal finance icici bank hdfc bank customers get this facility now know full details prp